Breaking News

सांगोला येथे चौथे धनगर आदिवासी साहित्य संमेलन होणार


म्हसवड / वार्ताहर : राज्यात व साहित्य क्षेत्रात मोठा दबदबा निर्माण केले असलेले चौथ्या आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला येथे होणार असून संमेलनाचे आयोजक, कार्यालय व स्वागताक्ष यांची निवड जाहीर करण्यासाठी रविवारी (ता.29) सांगोला, जि.सोलापूर येथे आयोजकांची बैठक होणार असल्याची माहिती धनगर आदिवासी साहित्य संभेलनाचे संयोजक डॉ.अभिमन्यू टकले यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, गतवर्षी म्हसवड येथे यशस्वी असे तिसरे साहित्य संमेलन संपन्न झाले होते. या संमेलनास महाराष्ट्र राज्याच्या कानाकोप-यातून धनगर समाजातील साहितिक यांचेसह विविध क्षेत्रातील धनगर जमातीचे मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.
धनगर हा स्वतःला आदिवासी समजत नसे, पण गेल्या चार वर्षांपासून आदिवासी धनगर साहित्य संमेलन होऊ लागले आणि महाराष्ट्र शासनाने या धनगर जमातीला आदिवासी तिचा सवलती तर दिल्याच शिवाय एक हजार कोटी रुपयांचा निधीही आदिवासी योजना साठी मंजूर केला आहे.