Breaking News

भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांची मदत ठाकरे सरकारने थांबवली


नागपूर : उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड आणि महापरीक्षा पोर्टल तसेच अन्य काही उपक्रमांना त्रुटी दूर होईपर्यंत स्थगिती दिली असून यानंतर आता भाजप नेत्यांच्या साखर कारखान्यांबाबतही मोठा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे आणि सोलापूर जिल्ह्यातील नेते कल्याण काळे या नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी 310 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. तो निर्णय आता मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला.