Breaking News

पंतप्रधान आहेत ते! त्यांना खोटे कसे ठरवायचे?

आपल्या देशाचे पंतप्रधान कुणा एका विचाराचे नसतात,म्हणूनच त्यांची बांधिलकी एका विशिष्ट विचारसरणीचे आधिष्ठान असलेल्या संघटनेशी अथवा राजकीय पक्षाशी नसते,किंबहूना भारताच्या लोकशाहीला हेच अपेक्षित आहे.विविधतेत एकता संपन्न असलेल्या या भुमीवर नांदणार्या लोकशाहीचे उत्तरदायित्व सांभाळणारा नेता तितकाच तटस्थ असावा ही अपेक्षा अगदीच गैर नाही.याच शुध्द हेतूने आम्हा भारतीयांचा आमच्या राष्ट्रनेत्यावर म्हणजेच पंतप्रधानांवर अगदी  पहिल्या स्वतंञ दिवसापासून या क्षणापर्यंत गाढा विश्वास आहे.तसा तो असायलाच  हवा,आमच्या पंतप्रधानांना आम्ही खोटे कसे ठरवणार?ते स्वतः आपल्या या विश्वासाला दुर्लक्षित करणार असतील तर माञ गोष्ट वेगळी.
.........................
भारत देशाच्या संविधानाच्या पहिल्याच पानावर हे संविधान भारतिय लोकांना अर्पित केल्याची भावना संविधानकार समितीने कायमची कोरून ठेवली आहे.याचाच अर्थ या संविधानात नमुद असलेला प्रत्येक शब्द जनतेच्या सर्वांगिण विकासाचा संदेश देत आहे,याचे भान जसे जनतेला असायला हवे तसेच आपल्या राज्यकर्त्यांनीही ती जाणिव ठेवायला हवी.याच संविधानामुळे या देशाची सत्ता आपल्या हातात जनतेने सोपवली आहे हे लक्षात ठेवून संविधानाप्रती निष्ठा कायम ठेवून जनतेशी नाळ जपावी ही अपेक्षा आहे.
आपल्या संविधानाने या देशाची पायाभरणी करतांना विविधतेतील एकतेचा खोलवर विचार केल्याचे दिसते..या मातीत कुठल्याही कडव्या विचारांचे आणि त्यातून जन्माला येणार्या धर्मांधतेचे विषारी रोप डोके वर काढणार नाही याची तजविज केली आहे.अलिकडच्या काळात माञ ही तजविज कडेलोटावर उभी असल्याचे दिसते.विविधतेच्या एकतेची छकले कलाण्याचा प्रयत्न जाणिवपुर्वक होऊ लागला आहे.या देशाला धर्मांधतेची कधीही आस नव्हती,आज याच धर्मांधतेने देशाला पोखरले आहे.त्याचे सारे दुःश्रेय अर्थाणाच गोळवलकर विचारसरणीला द्यावे लागेल.राष्ट्रियस्वयंसेवक संघाने देशात पेरलेल्या कट्टर हिंदूत्व वादाच्या बिया रूजून धर्मांधतेचा विषवृक्ष झाला आहे.हिंदू राष्ट्र या  धर्मांध स्वप्नामुळे देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये राष्ट्रीय असे काही नाही, आहे तो धर्म वेडेपणा आहे. संघ परिवाराचे गुरुजी गोळवलकर यांनीदि नेशन्हूड डिफाइनड ’’आणिबंच ऑफ थॉट मध्येहिटलरने ज्यून चे जे शिरकाण केले त्यापासून धडा शिकला पाहिजे अशी मांडणी केली आहे.  त्यांच्यानंतर जेव्हा सरसंघचालक म्हणून श्री सुदर्शन यांनी पदभार स्वीकारला त्यावेळेला 19 मार्च 2000 च्या पांचजन्य ऑर्गनायझर या त्यांच्या मुखपत्रातून आलेल्या मुलाखतीमध्येहिंदू बिगर हिंदू यांच्यामध्ये महाभारत कालीन युद्ध प्रमाणे महायुद्ध लवकरच भडकेल असे वक्तव्य केले. याबाबत डॉक्टर रफिक झकेरिया यांनी 1985 साली लिहिलेल्या वायडनिंग डिवाइड या पुस्तकात  धर्म अतिरेकामुळे देशावर ओढवणार्या संकटाची चाहूल त्यांना लागल्याचे स्पष्ट दिसते,  आणि ते निराश झालेत असे चित्र होते. सावरकरांच्या हयातीत गुरु गोळवलकर त्यांचे कधीच पटले नाही .सामाजिक प्रश्नावर तर त्यांचे तीव्र मतभेद होते.
पूर्वीचे संघ प्रचारक आणि विश् हिंदू परिषदेचे प्रमुख नेते अशोक सिंघल म्हणाले होते की आम्ही समाजवाद संपवला ,आता आम्हाला धर्मनिरपेक्षता संपवायची आहे संघाने आपल्या स्थापनेपासून हिंदुराष्ट्र संस्थापना चे अत्यंत चुकीचे उद्दिष्ट आपल्या डोळ्यापुढे ठेवले असून गेली 75 वर्षे येनकेनप्रकारेण ती त्या दिशेने पुढे सरकू पाहत होते आणि म्हणून त्यांनी लोक संसदेपुढे  आर एस एस या धर्म संघटनेचे आव्हान उभे केले. धर्मनिरपेक्ष आणि सर्व जाती जमातींना सामावून घेणार्या मूळ हिंदू धर्मापेक्षा हिंदुराष्ट्र हे अधिक महत्त्वाचे ठरवल्यामुळे सद्यपरिस्थितीत अधिक दाहकता निर्माण झाली आणि त्या ददाहकतेत  देशाचे काय होईल याची पर्वा या संघ परिवाराला नाही . त्यामुळे अलीकडच्या काळात मोहन भागवत, अमित शहा आणि मोदी या त्रिकुटाची  अत्यंत प्रखर आणि प्रतिगामी पावले हिटलरशाही च्या दिशेने वळत आहेत. आज लोकसभा आणि राज्यसभेचे मध्ये संमत केलेला नागरिकत्व दुरुस्ती विधेयक याला भारतातल्या सर्व नागरिकांनी धर्मस्वातंत्र्य पाळून राज्य धर्म अलग ठेवले तर बहुसंख्य अल्पसंख्य प्रश् निश्चित संपेल. या प्रक्रियेत जर कोणाचा अडथळा असेल तर तो विविध धर्मीयांच्या
कट्टरपंथी यांचाच आहे धर्मांध जमातवादी त्यांच्या प्रतिनिधित्व करणार्या लोकांनी भारतीय संविधानाची चौकटच गेल्या आठवड्यात खिळखिळी केली. धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याची या भूमिकेमुळे राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि सर्वांना समान नागरिकत्व अधिकार आहेत ते संकटात सापडले.
आज हिंदू आणि मुसलमान बांधवांना भारतीय स्वातंत्र्यासाठी जीवाचे बलिदान केलेल्या अनेक मुस्लीम आणि हिंदूंचे स्मरण करण्याची गरज आहे त्याही पूर्वीच्या काळी संत कबीर, सावित्रीबाई फुले यांची सहकारी पहिली मुस्लिम शिक्षिका फातिमा बी शेख, परमवीर चक्राचे मानकरी अब्दुल हमीद, डॉक्टर झाकीर हुसेन, न्यायमूर्ती छगला ,न्यायमूर्ती हिदायतुल्ला यांची मुस्लिम समाजाने उपेक्षा केली आणि आज हिंदूही करताहेत .आम्हाला आज गरज आहे त्या अनेक मंडळींची जे आपापल्या देशात उदारमतवादी प्रभाव वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहेत आणि होते .त्यातील काही आज तुरुंगात आहेत ,काहींची हत्या इस्लाम मधील आणि हिंदू मधील तालिबान्यांनी केली आहे. पण जगभरच्या अनेक ठिकाणी हा उदारमतवादी प्रवाह प्रभावीपणे काम करतो .नेदरलँड च्या संसद सदस्य औसावा चेरीवी इराणच्या प्रोफेसर परिबा अडेहका , बुक अँड कुराण लिहिणारे सीरियाचे मोहम्मद शहरुर सीरियाचे धर्मनिरपेक्ष विचारवंत सादिक जलाल  तुर्कस्तानच्या फतुलाह गुलेल अब्दुल , वीरांचे अब्दुल करीम सोरोश ,पाकिस्तानची नझिर अहमद नोबेल पारितोषिक विजेते नगिब मेहफूज,  पाकिस्तानची अखतर आमिर खान, ईराणची लेखिका मरियम  ,पत्रकार फौद ,पटण्याचे प्रोफेसर .आर.बेदर, सौदी अरेबियाचे रहमान ,बांगलादेश दाऊद हैदर तसलीमा नसरीन ,  इंग्लंडचे सलमान रश्दी इत्यादी अनेक लोक मुस्लीम समाजात उदारमतवाद रुजवण्याचा प्रयत्न करीत  महाराष्ट्रामध्ये सुद्धा हमीद दलवाईंच्या सारखे लोक संपले असे म्हणण्याचे कारण नाही त्यांच्या मागे सुद्धा मुस्लिम सत्यशोधक मंडळ आणि अशाच अनेक इन्स्टिट्यूट धर्मनिरपेक्ष विचार मांडण्याचे काम करीत असतात त्यांची दखल हिंदूनी घेण्याची गरज आहे
कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक नागरिकांनी राष्ट्रीय सेवक संघाला पडलेले आणि भाजपच्या रूपात ते साकार करण्याचा होत असलेला एक हिंदू राष्ट्र हा अतिरेकी विचार हाणून पाडायला हवा.या देशाच्या संविधानाला आणि पर्यायाने जनतेला बांधिल असलेले पंतप्रधान दुहेरी भुमिका घेतात,तेंव्हा आमचे पंतप्रधान म्हणून आम्ही त्यांना  खोटे ठरवू शकत नाही.कारण ते आमचे पंतप्रधान आहेत.माञ त्याचवेळी त्यांची दुटप्पी आणि संधीसाधू भुमिकाही दुर्लक्षीत करता येत नाही.थेटच सांगायचे झाले तर कालपरवा रामलिला मैदानावर झालेल्या सभेत पंतप्रधानांनी एनआरसीवर कुणी चकार शब्द बोलत नसताना तुकडे तुकडे गँग देशात दंगाबाजी करीत आहेत असा थेट आरोप विरोधकांवर केला होता.त्यांच्याआरोपाचे तात्पर्य असे होते की एनआरसीवर सरकार कुठलीही चर्चा करीत नाही.राष्ट्रपतींच्या अभिभाषणात एनआरसीचा स्पष्ट उल्लेख असताना,राजनाथ सिंग मागच्या सरकारमध्ये असतांना त्यांच्याकडून एनआरसीसंदर्भात उल्लेख झालेला असतांना ,इतकेच नाहीतर काल परवा सीएएवर संसदेत बोलतांना अमित शहा यांनी सांगितलेल्या घटनाक्रमातही एनआरसी येणार असे स्पष्ट केले असताना पंतप्रधान देशाला संभ्रमीत करतात.मग खोटे कोण बोलते? पंतप्रधानांना तर खोटे ठरवता येणार नाही.मग संसदेत बोलणारी मंडळी पंतप्रधानांच्या जाहीर वक्तव्याने खोटे ठरतात हे सत्य मानायचे?