Breaking News

गॅलॅक्सी ग्रूपच्या वतीने मुलांना ब्लँकेट

अहमदनगर/प्रतिनिधी : “आजच्या धकाधकीच्या जीवनात सणाच्या काळात माणूस कुटुंबाबरोबर असतो. पण अशा वेळी ज्यांचे कुटुंब नाही अशा लोकांचा लक्ष ठेवणे व सामाजिक भान ठेवून त्यांच्यासाठी काहीतरी करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे’’, असे प्रतिपादन डॉ. प्रवीण पाटोळे यांनी केले.
गॅलॅक्सी ग्रूपच्या वतीने माळीवाडा येथील महात्मा फुले वसतिगृहातील सर्व मुलांना गरम ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रवीण पाटोळे, रुग्णमित्र नादिर खान, डॉ.अर्चना घोडके, डॉ.मनाली गायकवाड, डॉ. ऐश्‍वर्या पेडणेकर, संतो
ष गायकवाड, बबीता पाटोळे, सोनल मिसाळ, अक्षय साठे, शुभांगी देशपांडे, थोरात सिस्टर, वारे सिस्टर, शाहनवाज तांबोळी, अहमद तांबोळी आदी उपस्थित होते.
सूत्रसंचालन शहानवाज तांबोळी यांनी केले. आभार गणेश कोरडे यांनी मानले.