Breaking News

‘अटोक्लस्टर’मध्ये स्कील इंडिया' प्रशस्तिपत्र वितरण

अहमदनगर प्रतिनिधी
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाॅटो क्लस्टरच्या चार बॅचेसमधून ९८ मुले / मुली उत्तम शेरा मिळवून उत्तीर्ण झाले. या विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा अहमदनगर ‘अटोक्लस्टरमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रशिक्षणार्थींना भारत सरकारचे स्कील इंडिया प्रशस्तिपत्र देऊन नुकतेच गौरविण्यात आले.
अटोक्लस्टर प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत सीएनसी ट्रेनिंग फिटर फॅब्रिकेशन हे दोन कोर्स पूर्णपणे मोफत स्वरुपात या सेंटरमध्ये चालविले जातात. .१० वी पास १८ वर्षे पूर्ण झालेले युवक अथवा युवती या प्रशिक्षणास पात्र आहेत. योग्य कागदपत्रे जमा करुन ते योजनेमध्ये भाग घेऊ शकतात. हा प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी करण्यासाठी लागणारे सर्व तंत्रज्ञान मोजमापन उपकरणे अद्ययावत सीएनसी मशीन या संस्थेमध्ये उपलब्ध आहेत. एनएसडीसी  तर्फे घेण्यात आलेल्या ऑडिटमध्ये अहमदनगर ऑटो क्लस्टरला उच्च गुणवत्ता प्राप्त झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव फाईव्ह स्टार सेंटर म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे.
सध्याच्या वाढत्या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी कौशल्य विकास हा एकमेव उपाय तरुणांच्या हातामध्ये आहे. परंतु काही कारणास्तव पैसे खर्च करुन काही कोर्स करणे मुलांना परवडत नसल्याने आणि कौशल्याचा अभाव असल्याने आज बरेचसे तरुण बेरोजगार राहत आहेत. अशा तरुणांसाठी सरकारने काही कोर्स उपलब्ध करुन दिले आहेत. त्यातलेच हे दोन कोर्स- सीएनसी आणि फिटर फॅब्रिकेशन ज्याची आज औद्योगिक क्षेत्रात खूप आवश्यकता आहे. ते अहमदनगर ऑटो क्लस्टरमध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत राबविण्यात येतात.
या कार्यक्रमास  क्लस्टरचे संचालक मिलींद कुलकर्णी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. क्लस्टरतर्फे घेण्यात येणार्या प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेची कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थी युवकांना माहिती दिली. उद्योगासाठी लागणारे मनुष्यबळ हे कुशल मनुष्यबळ असावे लागते युवकांनी क्लस्टरमध्ये उपलब्ध असलेल्या या कोर्सचा फायदा करुन घ्यावा स्वत:च्या पायावर समर्थपणे जीवन जगावे, असा संदेश दिला. अहमदनगर मधील तरुणांसाठी क्लस्टरजे विविध प्रयत्न करीत आहेत या संदर्भातील माहिती त्यांनी युवकांना दिली.
क्लस्टरचे उपाध्यक्ष देशमुख यांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेंतर्गत अद्यापपर्यंत घेण्यात आलेल्या विविध बॅचेसचा अहवाल सादर केला. क्लस्टरमध्ये उपलब्ध असलेल्या आधुनिक यंत्र सामुग्रीद्वारे सीएनसीमध्ये कुशल मनुष्यबळ उभारु शकतो, याची माहिती त्यांनी दिली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 'ग्लोबल रिच'चे यशांजली चौधरी आणि प्रशिक्षण समन्वयक वैभव खंदारे यांनी परिश्रम घेतले.