Breaking News

शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळेच विद्यार्थी मोठ्या उंचीवर : नय्यर


अहमदनगर : प्रतिनिधी
जिद्द, हिम्मत निष्ठा हे गुण अंगी असतील, तर तुम्ही मोठे होऊ शकता. आजही ही आदर्श पिढी देशाला प्रगतिपथावर घेऊन जाणारी आहे. जीवनात चांगला अभ्यास करून यश मिळविण्याची जिद्द ठेवा, यश हमखास मिळेलच. आई, वडील शिक्षकांप्रती आदरभाव मनात ठेवा त्याप्रमाणे कृती करा. त्यांचे आशिर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहतील. विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळाल्यास ते यश संपादन करतात. त्यांच्या या यशात शिक्षकरूपी गुरूंचा मोठा वाटा असतो. शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थी मोठ्या उंचीवर पोहोचतात, असे प्रतिपादन बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष काकाशेठ नय्यर यांनी केले.
बायजाबाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्या मंदिर श्रीमान बिशंभरदास अमरचंद नय्यर माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलन आणि वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. उद्योजक कमल सबलोक, मनपा शिक्षण विभागाचे सुभाष पवार, बाळासाहेब पवार यांच्या हस्ते सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी पर्यवेक्षक जुबेर पठाण, उपाध्यक्ष रेवजी पवार, नगरसेविका संध्या पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, गोरे, वीर, निखील वारे, किसनराव लोटके, शेटे, बापूराव आंधळे, सातपुते सर, जनाबाई आंधळे, राऊत सर, आदिनाथ घुगरकर, पठाण आदी उपस्थित होते. उद्योजक कमल सबलोक यांचेही यावेळी समायोजित भाषण झाले. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत, बेटी बचाव, बेटी पढाव, प्लॅस्टिक हटाव, दुनिया बचाव, देशभक्तिपर गीते, भोंडला, कोळीगीत यासह नृत्य सादर करीत उपस्थितांना सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला. त्याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण माने सुधाकर जाधव यांनी केले. नगरसेविका संध्या पवार यांच्या हस्तेउमलत्या कळ्याया हस्तलिखिताचे विमोचन करण्यात आले. माध्यमिकचे मुख्याध्यापक श्रीकृष्ण पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. शाळेच्या वार्षिक कार्याच्या अहवालाचे वाचन प्राथमिकच्या मुख्याध्यापिका मंदा हांडे यांनी केले. यावेळी नगरसेविका पवार, नगरसेवक सुनील त्र्यंबके, निखील वारे, किसनराव लोटके आदींची भाषणे झाली. कार्यक्रमास विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्षभरात विविध स्पर्धांत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन कावेरी वाघ स्वाती पवार यांनी केले. संतोष नागरगोजे यांनी आभार मानले.