Breaking News

'स्वर्णमाला' दिनदर्शिकेचे देवगडला प्रकाशन


अहमदनगर / प्रतिनिधी
संस्थेवर विश्वास दर्शविणाऱ्यांमुळे सहकार चळवळ पुढे नेता येते. आर्थिक सहाय्य देणारी संस्था चालविणे, हे काम समाजाच्या हिताचे असले तरी आपण ते काम निस्वार्थीपणे करत राहिल्यास पतसंस्था या छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसायासाठी प्रोत्साहन देऊन स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न करत असते, असे प्रतिपादन देवगडचे सदगुरू भास्करगिरी महाराज यांनी केले.
अहमदनगरमधील लक्ष्मीबाई कारंजा येथील स्वर्णमाला पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन श्री क्षेत्र दत्त देवस्थान देवगडचे सदगुरू भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोरक्षनाथ महाराज दुतारे, स्वर्णमाला पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन अण्णासाहेब म्हस्के, संचालक प्रा. पी. एम. साठे, धोंडिभाऊ दातीर, दिलीप खोसे, सुरेश प्रधान, राहुल पासकंटी, चंद्रकांत त्रंबके, संकल्प म्हस्के आदी उपस्थित होते.