Breaking News

ट्रॅक्टर ट्रॉली खाली येऊन मुलीचा मृत्यूनेवासे/प्रतिनिधी
 ऊस ओढण्याच्या प्रयत्नात ट्रॅक्टर ट्रॉली खाली आल्याने नऊ वर्षीय शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना नेवासा तालुक्यातील बाभुळखेडा शिवारात शनिवारी सायंकाळी घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
 या बाबत माहिती अशी की, शनिवारी दुपारी ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर दोन ट्रॉली लावून सलबतपूर कडून भेंडा कारखान्यावर चालला होता. तेव्हा विद्या राजेंद्र औताडे या शाळकरी मुलीने पहिल्या ट्रॉलीवरील ऊस ओढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तिचा तोल गेल्याने ती ट्रॅक्टरच्या दुसऱ्या ट्रॉलीखाली आली. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला. तिचा मृतदेह उत्तरतपासणीसाठी नेवासाफाटा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला. त्यानंतर तिच्या अत्यंसंस्कार करण्यात आले.