Breaking News

माती, पाणी परीक्षणानुसार पिके घ्यावीत डॉ. वराट यांचे प्रतिपादन


भाविनिमगाव/प्रतिनिधी ः 
बदलत्या शेती पध्दतीत शेतकर्‍यांनी माती व पाणी परीक्षण केले नाही तर भविष्यात शेती संदर्भात अनेक विपरीत समस्या निर्माण होतील. यामुळे शेती व्यवसायच संकटात सापडणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी शेतीतील माती व पाणी परीक्षण करून त्यानुसार पिके घ्यावीत, असे प्रतिपादन डॉ. टी. एम. वराट यांनी केले.
नगर येथील मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने आयोजित माती आणि पाणी परीक्षण विषयावर एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे समन्वयक डॉ. सासवडे, डॉ.एस. टी. लवांडे उपस्थित होते.
 त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन झाले. शेती तज्ज्ञ  व प्रमुख मार्गदर्शक असलेले डॉ. मधुकर हेगडे यांनी शेती व्यवसायात सेेंंद्रीय कार्बनचे महत्त्व, डॉ. पुरुषोत्तम वायाळ  यांनी ग्रामविकास, डॉ. ए. बी. कडलग यांनी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व प्राचार्य डॉ. के. के. देशमुख यांनी  माती परीक्षण विषयावर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.  कार्यक्रमास परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रसायनशास्त्र विभागाच्या विद्यार्थ्यांनी माती व पाणी परीक्षणाचे प्रात्यक्षिक करून दाखवले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयीन प्राध्यापक व प्रशासकीय सेवक यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक जी. एस. सोनवणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. के. आर पिसाळ यांनी केले.  आभार बी. एस. पवळे यांनी मानले.