Breaking News

‘बँकेत इंग्रजी ऐवजी मराठीत माहिती द्यावी’ जामखेड/प्रतिनिधी
 बँकेत इंग्रजी ऐवजी मराठीत नवीन वेळापत्रक, कामकाजाची माहिती,तक्रार निवारण फोन नंबर लावण्याची मागणी सरपंच समीर पठाण यांनी सेंट्रल बँक इंडिया पाटोदा शाखाधिकारी यांच्याकडे  निवेदनाद्वारे केली आहे. आपण महाराष्ट्रात आहोत तेव्हा मराठी भाषेलाच प्राधान्य द्यावे असे  निवेदनांत म्हटले आहे.
  जामखेड तालुक्यातील पाटोदा शाखेच्या आधिकारी कर्मचारी यांच्याकडून ग्राहकांना सेवा देतांना वेळेची भाषेची अडचण येत आहे. अशिक्षित ग्राहकांना इंग्रजी मधील माहिती कळत नाही. तसेच बॅंकेच्या कर्मचारयांनी नवीन वेळेचे पालन करावे, वरिल बाबींची पूर्तता लवकर करावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी मामा निंबाळकर,पोपट वाळुंजकर,जालिंदर महारनवर, बाळू खटके,शेरखानभाई, भाऊ शिंदे, बबलू शिरसाठ आदी ग्रामस्थ उपस्थित होते.


 रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमानुसार बँकेच्या कामकाजाच्या वेळा तक्रार निवारण दूरध्वनी क्रमांक बँकेच्या दर्शनी भागावर मराठी भाषेत लावला आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रातील कोणत्याही ग्राहकाला कोणतीही अडचण येणार नाही. आल्यास आमचा स्टाफ त्याचे तक्रार निवारण करेल. ग्रामपंचायत सरपंचांच्या तक्रारी, सूचना स्विकारल्या आहेत असे.
पांडूरंग उत्तम शिंदे,  शाखाधिकारी, सेंट्रल बँक इंडिया, पाटोदा