Breaking News

मंत्रिमंडळात घटक पक्षांनाही मिळणार स्थान !


मुंबई ः राज्यमंत्रिमंडहाचा विस्तार सोमवारी येत्या 30 डिसेंबरला होत आहे. मंत्रिमंडळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत आघाडीसोबत राहिलेल्या घटक पक्षांना मंत्रीपद देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँगे्रसचे सर्वेसर्वा शरद पवार सकारात्मक असल्याचे सांगण्यात येत आहे. महाआघाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला स्वाभिमानी शेतकरी संघटना, समाजवादी पक्ष, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, प्रहार संघटना आणि शेतकरी कामगार पक्षांनी साथ दिली. त्यामुळे या पक्षांच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला अनुकूल वातावरण होते. त्या परिस्थितीत देखील हे घटक पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिशी राहिले होते. त्यामुळे मंत्रिमंडळात या घटकपक्षांच्या नेत्यांनाही मंत्रिमंडळात वाटा मिळेल असे कळते.
लोकसभा निवडणुकीत भाजपने अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळवल्यानंतर महाराष्ट्रातदेखील भाजपमय वातावरण होते. राष्ट्रवादीचे दिग्गज नेते भाजपामद्ये सहभागी झालेत. काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष केवळ नावापुरतेच शिल्लक राहणार की काय अशी स्थिती मुद्दाम निर्माण करण्यात आली होती. अशा स्थितीतही घटक पक्षांनी आघाडीची साथ दिली. पीपल्स रिपब्लीकन पार्टीचे नेते जोगेंद्र कवाडे यांनी आघाडीला दोन्ही निवडणुकीत विनाअट पाठिंबा दर्शविला होता. तर भाजपने अजित पवारांच्या मदतीने सरकार स्थापन केल्यानंतर देखील बच्चू कडू यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शविला होता. तर राजू शेट्टी देखील शेतकरी प्रश्‍नी आघाडीत सामील झाले होते.