Breaking News

भारत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था

नवी दिल्ली : भारत 2026 मध्ये जर्मनीला मागे टाकून जगातील चौथी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था आणि 2034 मध्ये जपानला मागे टाकून तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनू शकते. एका अहवालात ही बाब समोर आली आहे. या अहवालात म्हटले आहे की, भारत 2026 पर्यंत पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकते. परंतु, सरकारने देशाला 2024 पर्यंत पाच हजार अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचे लक्ष्य निश्‍चित केले आहे.  ब्रिटन स्थित सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्चचा (सीईबीआर) अहवाल ’वर्ल्ड इकॉनॉमिक लीग टेबल 2020’ नुसार, भारत 2019 मध्ये ब्रिटन आणि फ्रान्स या दोन्ही देशांना निर्णायकरित्या मागे टाकत जगातील पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आता भारत 2026 मध्ये जर्मनीला मागे टाकून चौथी तसेच 2034 मध्ये जपानला मागे टाकून तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होण्याचा अंदाज आहे. सीईबीआरने म्हटले की, जपान, जर्मनी आणि भारतात पुढील 15 वर्षांपर्यंत तिसरे स्थान मिळवण्यासाठी स्पर्धा चालेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे भारतीय अर्थव्यवस्थेला 2024 पर्यंत 5000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याच्या प्रश्‍नावर अहवालात म्हटले आहे की, भारत पाच हजार अब्ज डॉलरची जीडीपी 2026 मध्ये प्राप्त करेल. सरकारने निश्‍चित केलेल्या लक्ष्यानुसार हे उद्धिष्ठ दोन वर्षांनी पूर्ण होईल.