Breaking News

पाकिस्तान अमेरिकेच्या काळ्या यादीत कायमवॉशिंग्टन : देशातील नागरिकांना धार्मिक स्वातंत्र नाकारणार्‍या देशांच्या काळ्या यादीत अमेरिकेने यावर्षीही पाकिस्तानला कायम ठेवले आहे. यावरून जळफळाट व्यक्त कराताना पाकिस्तानने या वादात भारताला ओढले आहे. ज्या देशांमधील नागरिकांना धार्मिक स्वातंत्र दिले जात नाही, धर्माच्या आधारे नागरिकांमध्ये भेदभाव केला जातो त्या देशांना या यादीमध्ये टाकण्यात येते. मागील आठवड्यात अमेरिकेने ही यादी जाहीर केल्यानंतर केली. यावरून भारतावर टीका करताना पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने म्हटले आहे की, आमच्यावर केले जाणारे आरोप मान्य नाही. अमेरिकेची कृती वास्तवाला धरून नाही. भारतामध्ये अल्पसंख्यांकाना त्रास दिला जातो पण या यादीमध्ये भारताचा समावेश करण्यात आलेला नाही. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या या वार्षिक यादीमध्ये पाकिस्तानसोबत नऊ देशांचा सलग दुसर्‍यांदा समावेश करण्यात आला आहे. सुदान या एकमेव देशाला जुन्या यादीमधून वगळण्यात आले आहे. अमेरिकेने 18 डिसेंबर रोजी जारी केलेल्या या यादीमध्ये ब्रम्हदेश, चीन, इरिट्रिया, ईराण, उत्तर कोरिया, पाकिस्तान, सौदी अरेबिया, तझाकिस्तान आणि तुर्केमेनिस्तान या देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्य कायदा 1998 अंतर्गत या देशांचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत केवळ 2009 साली या यादीमध्ये भारताचा समावेश करण्यात आला होता.