Breaking News

आरक्षण बाधित जमीनमालकांसाठी बैठक

अहमदनगर/ प्रतिनिधी : विविध कारणांकरिता भूसंपादित होणार्‍या व झालेल्या जमिनींच्या मोबदल्याविषयी नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदूरबार या जिल्ह्यातील भूसंपादन, आरक्षण बाधितांची एक महत्त्वपूर्ण बैठक भूसंपादन आरक्षण बाधित जमीनधारक असोसिएशनच्या वतीने रविवारी (दि.29) दुपारी 12 ते 3 पर्यंत एचआरडी सेंटर, जुना आग्रा रोड, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेजवळ होणार आहे.
बैठकीमध्ये 5, 10, 15 वर्षांत उद्योग उभारणी न झालेल्या जमिनी, आदिवासी जमिनी, शासनाने जप्त केलेल्या जमिनी, नजराणा रक्कम, नुकसानभरपाई उशिरात मिळाल्यास त्यावरील व्याज, एमआयडीसी, सिडको, पाझर तलाव, कॅनॉल, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग, रेल्वे, म्हाडा, महापालिका, नगर परिषदांच्या आरक्षित जमिनी व इतर केंद्र, राज्य सरकार प्रकल्प, गॅस पाईपलाइनकरिता झालेल्या संपादनाची योग्य वाढीव नुकसानभरपाई, रिक्विझिशन कायद्याखाली मर्यादित कालावधीकरिता शासनाने घेतलेल्या जमिनी परत मिळविणे, कब्जेदारास भूसंपादन नुकसान भरपाईची 60 टक्के रक्कम मिळवून देणे, बांधकामांवरील सुमारे 12 टक्के सर्व्हिस टॅक्स तसेच महापालिका भाडेकरारातील मासिक भाडे रकमेवर अन्यायकारकरित्या आकारलेले 50 ते 60 टक्के प्रॉपर्टी टॅक्स कमी करणे यासारख्या विविध विषयांबाबत चर्चा व मार्गदर्शन व पुढील दिशा बैठकीत ठरविण्यात येणार आहे.
या बैठकीस संबंधितांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नाशिक विभागीय सचिव सुभाष तन्वर, नगर जिल्हा सचिव अशोक सब्बन, संजीव भूषण, जिल्हा सहसचिव प्रवीण कोडम यांनी केले आहे.