Breaking News

लेफ्टनंट शिवांगी नौदलातील पहिली महिला पायलट

lieutenant shivangi
मुंबई
लेफ्टनंट शिवांगी या नौदलात पहिल्या महिला पायलट म्हणून रुजू झाल्या आहेत. केरळमधील कोची तळावर त्या सोमवारी रुजू झाल्या आहेत. त्यांना डॉर्निअर विमान उडवण्याची परवानगी मिळाली आहे. नौदलातील पहिल्या महिला पायलट ठरलेल्या शिवांगी यांच्यावर देशभरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.
नौदलाच्या माहितीनुसार, सब लेफ्टनंट शिवांगी यांनी शॉर्ट सर्विस कमिशनद्वारे (एसएससी) 27 व्या एनओसी कोर्समध्ये प्रवेश घेतला होता. त्यानंतर गेल्या वर्षी जून महिन्यांत केरळच्या ऐझिमाला येथील भारतीय नौदल अकादमीतून त्यांनी आपले प्रशिक्षण पूर्ण केले. दरम्यान, त्यांनी दीड वर्षे पायलटचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर सोमवारी शिवांगी यांची नौदलाची पहिली महिला पायलट म्हणून घोषणा करण्यात आली. शिवांगी या मुझफ्फरपूर इथल्या रहिवाशी आहेत. मी खूप पूर्वीपासूनच महिला पायलट होण्याचे स्वप्न पाहत होती, आणि आता इतक्या वर्षांच्या प्रयत्नानंतर हे स्वप्न प्रत्यक्षात उतरले आहे, याचा सर्वाधिक आनंद मला होत आहे. या आनंदाचे शब्दात वर्णन करता येणार नाही. आता मी माझे पुढील प्रशिक्षण पूर्ण करण्याची वाट पाहत आहे, असे शिवांगी यांनी सांगितले.