Breaking News

तहसिलदार यादव यांचे हृदयविकाराने निधन


अहमदनगर / प्रतिनिधी 
जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवाशी असलेले आणि सोलापूर जिल्ह्यातील एटापल्लीचे तहसीलदार सुभाष यादव(३१) यांचे आज सकाळी साडेदहाळी वाजता ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात निधन झाले. यादव हे आलापल्ली येथे पत्नी लहानग्या मुलासह वास्तव्य करीत होते. यादव यांना आज सकाळी वाजताच्या सुमारास घरीच अचानक ह्रदयविदाराचा झटका आला. त्यांना तत्काळ अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांना दुसरा झटका आला आणि काही क्षणातच त्यांचे निधन झाले. सुभाष यादव हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथील रहिवासी होते. ते २०१४ च्या तुकडीतील अधिकारी असून, वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे नायब तहसीलदार म्हणून त्यांची पहिली पदस्थापना झाली.