Breaking News

अखिल गोगाईंच्या घरावर एनआयएचा छापा


गुवाहाटी: सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात आसाममधील प्रमुख आंदोलक असलेले शेतकरी नेते अखिल गोगोई यांच्या घरावर आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) छापे घातले. गोगोई सध्या एनआयए कोठडीत असून बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यानुसार (युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसाममध्ये झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी त्यांना 12 डिसेंबर रोजी पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी गोगोई यांचा ताबा एनआयएकडे सोपवला होता. 17 डिसेंबर रोजी गोगोईयांना एनआयए विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यावेळी कोर्टाने गोगोई यांना 10 दिवसांची एनआयए कोठडी सुनावली होती.