Breaking News

औरंगाबाद शहरात बिबटयाचा धुमाकूळ


सहा तासानंतर जेरबंद करण्यात वनविभागाला यश

Bibtya
औरंगाबाद
शहरात बिबटया दिसल्यामुळे एकच खळबळ उडाली. या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या कर्मचार्‍यांकडून प्रयत्न केले जात होते. मात्र, तो हाती लागत नसल्याने कर्मचार्‍यांच्या नाकीनऊ आले होते. अखेर सहा तासांच्या प्रयत्नांनतर त्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या कर्मचार्‍यांना यश आले आहे. दरम्यान, भरवस्तीत बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
औरंगाबाद शहरातील सिडको एन 1 या भागात बिबट्या आढळून आला आहे. रहिवासी भागात बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाचे पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते. औरंगाबाद शहरातीस सिडको एन 1 हा भाग गजबजलेला भाग आहे. येथील काळा गणपती मंदिर परिसरात बिबट्या आढळून आला. बिबट्या येथे आल्याची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाचे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बिबट्याने येथील एका बंगल्याच्या आवारात ठाण मांडून होता, अशी माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांने यावेळी दिली. बिबट्याला पकडण्यासाठी संपूर्ण परिसर रिकामा करण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. बिबट्याचे लोकेशन सापडल्यानंतर बिबटयाला ताब्यात घेण्यासाठी वन विभागाला सहा तास चांगलाच घाम काढावा लागला.