Breaking News

कोपरगाव अत्याचार प्रकरणातील आरोपीस पोलिस कोठडी

कोपरगाव / ता. प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपी अमोल निमसेला पोलिसांनी अटक केली असून त्यास आज जिल्हासत्र न्यायलात हजर केले. न्यायालयाने त्यास 24 डिसेंबर पर्यत पोलिस कोठडी सुनावली आहे. सदर आरोपी सिन्नर तालुक्यातील वंडांगळी या गावात पकडण्यात आला.
कोळपेवाडी येथे काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाला होता. या प्रकरणातील आरोपी फरार होता. आऱोपींचे फोटो पोलिसांनी प्रसिद्ध करून आरोपीबाबत माहिती मिळाल्यास पाठवण्याचे आवाहन केले होते. कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेमधील तपास पथकातील सर्व अधिकारी कोपरगाव तालुका व शहर पोलिस, शिर्डी पोलिस ठाण्याचे कर्मचारी यांनी 5 दिवस मेहनत घेतली. आरोपीच्या शोधासाठी पथके पाठवण्यात आली होती. अखेर आरोपी अमोल अशोक निमसे याला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. पाच विविध ठिकाणी पथके आरोपीच्या शोधात पाठविण्यात आली होती.
आरोपी एका ठिकाणी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस पथकाने त्याला अटक केली आहे, अशी माहिती शिर्डी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.