Breaking News

महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायदा बनवणार : राजनाथ सिंह

Rajnath Singh
नवी दिल्ली
हैदराबाद येथील डॉ. प्रियंका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणाचे पडसाद संसदेतही उमटलेत. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची कठोर शब्दात निंदा केली. तसेच, या घटनेमुळे संपूर्ण देशाला लाज आणली आहे. यामुळे प्रत्येकालाच दुःख झाले आहे. गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी. महिलांविरोधातील अशाप्रकारचे गुन्हे संपुष्टात आणण्यासाठी व त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही कायद्याची निर्मिती करण्यास तयार आहोत, ज्यासाठी संपूर्ण सभागृह देखील सहमत असेल, असे देखील त्यांनी सांगितले.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी जलदगती न्यायालय स्थापन करण्याचे निर्देश तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी  दिले आहेत. शिवाय याप्रकरणी तीन पोलिसांना देखील निलंबित करण्यात आलेले आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने एक समिती नेमली आहे. तर केंद्र सरकारने महिलाविरोधी गुन्ह्यांबाबत राज्य सरकारांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. हैदराबादेतील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर ही कार्यवाही करण्यात आली आहे. समाजवादी पक्षाच्या राज्यसभेतील खासदार जया बच्चन यांनी देखील या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. निर्भया असो, कठुआ असो किंवा मग हैदराबादमध्ये घटलेली घटना असो, आता लाांना सरकारकडून योग्य आणि निश्‍चित उत्तर हवे आहे. ज्या पोलिसांनी निष्काळजीपणा केला, त्यांची नावे जाहीर केली पाहिजेत. आरोपींना जनतेसमोर ठेचून मारलं पाहिजे, अशा शब्दात जया बच्चान यांनी आपले मत नोदंवले.