Breaking News

संगमनेर खुर्द - रायतेवाडी रस्त्याचे भूमिपूजन संगमनेर/प्रतिनिधी
 महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जि..सदस्य मिलींद कानवडे यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा परिषदेच्या निधीतून संगमनेर खुर्द - रायतेवाडी रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. तसेच गावोगावी वाडीवस्तीवर पाणीपुरवठा, रस्ता काँक्रीटकरण, बंदीस्त गटार, पेव्हींग ब्लॉक, रस्ते, वीज पुरवठा, समाज मंदिर आदींसह विविध विकास कामे जि..च्या निधीतून मार्गी लागली आहेत.
 यावेळी सभापती निशा कोकणे, सुभाष गुंजाळ, सरपंच अजित शिंदे, उपसरपंच गुलाब शेख, तान्हाजी आहेर, बन्सी मंडलीक, किसन सातपुते, संजय गुंजाळ, शरद पावबाके, विलास शेख, ग्रामसेवक जोर्वेकर, महेश सातपुते, संजय गुंजाळ, जसीन शेख, भागवत गोफणे, भाऊसाहेब गुंजाळ, उत्तम टपले आदींसह  सर्व ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी नागरिक उपस्थित होते. संगमनेर खुर्द ते रायतेवाडी रोड या रस्त्याचा परिसरातील गावांना दळणवळणासाठी मोठा फायदा होणार असून याचे भूमिपूजन झाल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले आहे