Breaking News

'जिल्हा नियोजन'च्या निवडणुकीत पाऊलबुद्धे, शिंदे विजयी


अहमदनगर : प्रतिनिधी

नियोजन समितीच्या महानगरपालिका गटातून विनित पाऊलबुद्धे (राष्ट्रवादी) ४९ मते घेऊन विजयी झाले. सेनेच्या सुवर्णा जाधव यांना १४ मते तर मते बाद झाली. दुसऱ्या जागेसाठी शिवसेनेचे अनिल शिंदे विजयी झाले आहेत. त्यांनी सेनेचेच अमोल येवले यांचा पराभव केला
जिल्हा परिषद प्रवर्गातून धनराज शिवाजी गाडे (राष्ट्रवादी) तर नगरपालिका प्रवर्गातून गणेश बाबासाहेब भोस (राष्ट्रवादी) मनपा महिला प्रवर्गातून आशा काळे (भाजप) यांची यापूर्वीच बिनविरोध निवड झाली आहे. तीन जागेपैकी एका जागेवर भाजपच्या आशा कराळे बिनविरोध निवडून आल्या होत्या. त्यामुळे उर्वरीत दोन जागेसाठी मतदान झाले. त्यात सर्वसाधारण जागेवर शिवसेनेचे उमेदवार अनिल शिंदे यांनी शिवसेनेच्याच अमोल येवले यांचा पराभव करुन विजयी मिळविला तर नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) या जागेवर राष्ट्रवादीचे विनित पाऊलबुद्धे यांनी शिवसेनेच्या सुवर्णा जाधव यांचा पराभव करुन विजय मिळविला.
चौकट
खोळंबलेल्या प्रकल्पांना दिशा मिळेल?
जिल्ह्याचे आर्थिक नियोजन पाहण्यासाठी आणि शहर तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्प मार्गी लावण्याची जबाबदारी ज्या जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यांवर असते, त्या समितीच्या दोन जागांची नुकतीच निवडणूक झाली. काही सदस्य यापूर्वीच बिनविरोध झालेले आहेत. निवडणूक झाल्यानंतर आता या समितीच्या सदस्य आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामांना गती देण्याची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर रखडलेल्या विविध प्रक्रल्पांना दिशा मिळेल का, अशी विचारणा नागरिकांमधून केली जात आहे.