Breaking News

पीआरपीचे हजारो कार्यकर्ते जाणार भिमा कोरेगावला


अहमदनगर / प्रतिनिधी
भिमा कोरेगावच्या शौर्यदिनानिमित्त बुधवारी दि. जानेवारी रोजी पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे (पीआरपी) जिल्ह्यातील हजारो कार्यकर्ते शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत, अशी माहिती प्रदेश सचिव ॅड. दीपक मेढे यांनी दिली.
ते म्हणाले, महार शूर सैनिक अर्थात महार बटालियनच्या शौर्याचे प्रतिक म्हणून भीमा कोरेगावच्या शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातून नागरिक येत असतात. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या दुर्देवी घटना पाहता विद्यमान सरकारने पुरेशी खबरदारी घेऊन चोख बंदोबस्त ठेवला आहे. यावर्षीदेखील मोठ्या संख्येने जनसमुदाय अभिवादनासाठी येणार आहे. पँथर्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री गंगाधर गाडे, प्रदेशाध्यक्ष नागनाथ पवळे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रातून कार्यकर्ते शौर्य स्तंभास अभिवादन करण्यासाठी एकत्र जमणार आहे.
पीआरपीचे कार्यकर्ते शांततेत अभिवादन रॅलीने जाऊन शौर्य स्तंभास अभिवादन करणार असून, यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष पवन कुमार साळवे, डॉ. विजयकुमार पोटे, जिल्हाध्यक्ष बहादूर शेख, डॉ. सुनील महांकळे, जिल्ह्याचे कार्याध्यक्ष दादासाहेब शिंदे आदींनी नगर जिल्ह्याच्या कार्यकर्त्यांचे नियोजन केले आहे.