Breaking News

शिर्डी संस्थानला तूप खरेदीची खंडपीठाकडून परवानगी ३२ कोटींचे ८ हजार ४०० किलो तुपाची होणार खरेदी  शिर्डी/प्रतिनिधी
 शिर्डी संस्थानला २०२०-२१ सालासाठी ३१ कोटी ६३ लाख ८६ हजार रुपये किंमतीचे हजार ४०० क्विंटल गाईचे शुद्ध तूप खरेदी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने परवानगी दिली आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न  वराळे आणि न्या. अनिल किलोर यांनी शुक्रवारी (दि.२०) ही परवानगी दिली. ‘-निवीदेद्वारेही खरेदी प्रक्रिया केली जाणार आहे.   
  दरम्यान पुर्वीच्या पुरवठादाराच्या कंत्राटाची मुदत ३१ डिसेंबर २०१९ ला पूर्ण होणार आहे. म्हणून पुढील वर्षासाठीच्या खरेदीची-निवीदाप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पुर्वीच्याच पुरवठादाराकडून अथवा इतर पुरवठादाराकडून गाईचे तूप खरेदी करण्यासही खंडपीठाने परवानगी दिली.
 शिर्डी संस्थानतर्फे भक्तांना मोफत बुंदीचा प्रसाद दिला जातो. तसेच लाडू बनविण्यासाठी आणि भोजनालयामार्फत माफक दरात अन्न वितरीत करण्यासाठी गाईच्या तुपाची आवश्यकता असते. यासाठी पुढील वर्षाकरीता (२०२०-२१) संस्थानला हजार ४०० क्विंटल तुपाची आवश्यकता आहे. त्याची किंमत ३१ कोटी ६३ लाख ८६ हजार रुपये होते. या खरेदीला आणि या खरेदीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत पर्यायी खरेदीला परवानगी देण्याची विनंती संस्थानचे वकील नितीन भवर पाटील यांनी दिवाणी अर्जाद्वारे केली. सरकारतर्फे सहायक सरकारी वकील मंजुषा देशपांडे यांनी तर मुळ याचिकाकर्त्यातर्फे  ॅड. प्रज्ञा तळेकर, ॅड. अजिंक्य काळे आणि ॅड. उमाकांत औटे यांनी काम पाहिले.