Breaking News

कॅन्टोमेंटच्या हॉस्पिटलमध्ये प्रसूती विभाग पुर्ववत सुरु करा ; राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाची मागणी


अहमदनगर (प्रतिनिधी)

कॅन्टोमेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्य महिलांच्या सोयीसाठी प्रसूती विभाग पुर्ववत कार्यान्वीत करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी विद्याधर पवार यांची भेट घेऊन सदर प्रश् त्यांच्या निदर्शनास आणून दिले. या मागणीचे निवेदन पवार यांना देण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हा संघटक मतीन सय्यद, तस्लीम मतीन सय्यद, साजेदा शेख, यास्मीन सय्यद, आयेशा शेख, कदिर शेख, शहानवाज काझी, शाकीर शेख, मुजाहिद सय्यद, आवेज शेख, आमान शेख, शहेबाज शेख, मुनव्वर सय्यद आदींसह भिंगारमधील नागरिक महिला उपस्थित होत्या.
या निवेदनात म्हटले आहे, की कॅन्टोमेंट हद्दीतील नागरिकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविण्यात येत आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी असलेला प्रसूती विभाग बंद अवस्थेत आहे. यामुळे सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची मोठी गैरसोय होत आहे. त्यांना शहरात जाऊन सरकारी अथवा खाजगी हॉस्पिटलमध्ये सेवा घ्यावी लागत आहे. रात्री-अपरात्री महिलांना प्रसूतीला घेऊन जाण्याची वेळ आल्यास भिंगारमधून नगर शहरात येण्यासाठी कोणतीही सुविधा उपलब्ध नाही. रुग्णवाहिका असूनदेखील त्याला चालक नसल्याने रुग्णांना दवाखान्यात घेऊन जाण्यासाठी प्रश् निर्माण होत आहे. ही मोठी गांभीर्याची बाब असून, अशा परिस्थितीत सर्वसामान्य महिलांची हेळसांड होत आहे. यापूर्वी सदर हॉस्पिटलमध्ये महिलांची प्रसूती होत होती. तर अनेक ठिकाणाहून महिला येऊन या सुविधांचा लाभ घेत होत्या. मात्र कारण नसताना हा विभाग बंद करण्यात आला.
कॅन्टोमेंटच्या सदस्यपदी दोन महिला असूनदेखील महिलांचा प्रश् दोन वर्षापासून प्रलंबित आहे. या प्रश्नाकडे कोणी लक्ष दिले नसल्याचे शिष्टमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी पवार यांच्या निदर्शनास आणून दिले. भिंगार परिसरातील गरीब सर्वसामान्य कुटुंबातील महिलांची सोय होण्यासाठी कॅन्टोमेंटच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमध्ये प्रसूती विभाग पूर्वीप्रमाणे कार्यान्वित करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्यावतीने करण्यात आली आहे. हा प्रश् मार्गी लागल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.