Breaking News

नेवाशातील ज्ञानमाऊली चर्चला यात्रेचे स्वरुप


नेवासे / प्रतिनिधी ः
येथे प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मसोहळा व नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. नाताळ निमित्ताने आयोजित प्रार्थनेप्रसंगी नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्च भाविकांच्या गर्दीने फुलली होती. चर्च परिसराला यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
        जीवनात परमेश्‍वराची भक्ती करून आध्यात्मिक वाढ करा, परमेश्‍वराला स्वीकारा, जीवनामध्ये संस्कृती संस्कार शिका आणि शिकवा, देवाचे लेकरू बनण्यासाठी प्रयत्न करा, जे देवावर श्रध्दा ठेवतात ते देवाची लेकरे बनतात, असे ज्ञानमाऊली मंदिर चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर प्रकाश राऊत म्हणाले.
      शेवगाव विभागाचे पोलिस उपाधीक्षक मंदार जवळे, पोलिस निरीक्षक रणजित डेरे, नगराध्यक्ष सतीश पिंपळे, उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील, नगरसेवक सुनील वाघ, नगरसेवक राजेंद्र मापारी, गफूर बागवान, वास्तूशिल्पकार राजेंद्र परदेशी, सुनील जाधव, प्रेस क्लबचे अध्यक्ष पत्रकार सुहास पठाडे, मीडिया प्रतिनिधी कमलेश गायकवाड, मोहन गायकवाड, देवा वाघमारे, ख्रिस्ती भक्त मंडळाचे मार्कुस बोर्डे, सचिन धोंगडे, राजेंद्र पंडित, रवींद्र पवार यावेळी उपस्थित होते.
 यावेळी फादर राऊत यांचा सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला. पोलिस उपाधीक्षक जवळे, नगराध्यक्ष पिंपळे, उपनगराध्यक्ष पाटील, सुनील वाघ, बागवान
 सुधीर चव्हाण यांनी नाताळ सणानिमित्ताने ख्रिस्ती बांधवांना भाषणाद्वारे शुभेच्छा दिल्या.
       नेवासा शहरातील गंगानगर येथील बेथेल चर्चमध्ये    रेव्हरंड डेव्हिड राक्षे, पास्टर विजय थोरात, शारोन यांनी प्रार्थना व भक्तीगीते गायली. रेव्हरंड जगदीश चक्रनारायण, दत्ता अमोलिक, पास्टर सुभाष चक्रनारायण, पास्टर प्रकाश चक्रनारायण यांनी पवित्र प्रार्थनेद्वारे भक्तिगीते गात नाताळच्या सणाचे महत्त्व सांगितले. नेवासा तालुक्याचे आमदार शंकरराव गडाख यांच्या वतीने नेवासा शहरातील प्रत्येक चर्चमध्ये जाऊन भाविकांना मिठाई पाकिटांचे वाटप करण्यात आले.