Breaking News

फलटणमध्ये हुल्लडबाजांवर पोलिसांकडून कारवाई


फलटण /प्रतिनिधी : फलटण शहर पोलीस ठाण्याच्या मार्फत आज शहरात कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप पोमन व त्यांच्या पथकाने कॉलेज परिसर व कॉपी कॅफे येथे केली.
उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप पोमन यांच्यासह निर्भया पथक यांनी सकाळ पासूनच प्रमुख चौक तसेच महाविद्यालय परिसरात कारवाई करण्यात आली. सदर कारवाई मध्ये कॉलेज परिसरात असभ्य वर्तन करणार्‍या, चकरा मारणार्‍या मुलांवर कडक कारवाई केली व गुन्हे दाखल करण्यात आले.
विना परवाना वाहन चालविणे, ट्रिपल सीट, कागदपत्रे, विमा, वाहन प्रदुषण प्रमाणपत्रांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये 7 जणांवर कारवाई करुन दंड वसूल करण्यात आला. तसेच लक्ष्मीनगर येथे डे लाईट कॉफी कॅफे येथे अचानकपणे धाड टाकून अल्पवयीन  मुलींवर निर्भया पथकाव्दारे पोलिस ठाण्यात आणुन समुपदेशन केले. व त्यांच्या पालकांना बोलावून मुलामुलींना समज देवून पालकांच्या स्वाधीन केले. यापुढे अशा प्रकारचे वर्तन करणार नसल्याचे त्यांच्याकडून वदवून घेण्यात आले.
याचबरोबर कॉपी कॅफे चालक मालकाला 149 प्रमाणे नोटीस बजावण्यात आली. सदर कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप पोमन, निर्भया पथक प्रमुख वैभवी भोसले, आरोषी भोसले,  पोलिस कॉन्स्टेबल शिवराज जाधव, बनकर, हवालदार घाडगे आदीचा समावेश होता.