Breaking News

अवैध देशी-विदेशी मद्य, हातभट्टी दारुचा मोठा साठा जप्त


अहमदनगर / प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आणि या दोन्ही विभागांच्या विशेष पथकांनी नाताळ आणि नूतन वर्षाच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई केली. मिळालेल्या माहितीनुसार दि. २५ रोजीच्या पहाटेपासून या विभागांनी गव्हाणेवाडी, दाणेवाडी येथे हातभट्टी निर्मिती केंद्रावर तसेच वाळवणे, टाकळी ढोकेश्वर येथे अवैध देशी-विदेशी मद्याची वाहन तपासणी करताना दारुबंदी गुन्हा अन्वेषण कामी एकुण गुन्ह्यांची नोंद केली. या कारवाईत १४ लाख १३ हजार ७५०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच हजार ७०० लिटर रसायन नष्ट करण्यात आले.
या कारवाईदरम्यान संजय मारुती कार्ले, आप्पासाहेब मारुतराव काळे सुनिल हनुमंत दाते यांना अटक करण्यात आली. त्यांच्या ताब्यातुन देशी-विदेशी मद्य, हातभट्टी गावठी दारू, एक महिंद्रा कंपनीची स्कार्पिओ जीप, एक हुंडाई कंपनीची वेगरनर कार अशी दोन चारचाकी वाहने एक टिव्हीएस कंपनीची ज्युपीटर दुचाकी वाहन मद्य वाहतूक करताना जप्त करण्यात आले. सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क,पुणे विभागाचे विभागीय उपआयुक्त प्रसाद सुवे यांच्या आदेशान्वये पराग नवलकर, अधीक्षक, राज्य उत्पादन शल्क अहमदनगर तसेच सी. पी. निकम, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अहमदनगर यांचे मार्गदर्शनानसार संजय एम. सराफ, निराक्षक, राज्य उत्पादन शुल्क, -विभाग, अहमदनगर, बी. बनकर, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, -विभाग, अहमदनगर यांनी केली. सदर कारवाईत दुय्यम निरीक्षक, जी. आर. चांदेकर, एस. एस. भोसले, महिपाल धोका, व्ही. जी. शी, वाहन चालक पांडुरंग गदादे, महिला जवान स्विटी राठोड, जवान निलेश शिंदे, अरुण जाधव, योगेश मडके, वसंत पालवे, सचिन वामने, अविनाश कांबळे, भरत तांबट, नंदकुमार ठोकळ यांनी सहभाग घेतला. पुढील तपास निरीक्षक संजय सराफ अण्णासहेब बनकर करीत आहेत.