Breaking News

औरंगाबादमध्ये भीषण अपघातात चौघांचा मृत्यू


औरंगाबाद : औरंगाबाद-जालना मार्गावर झालेल्या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे. भरधाव कारने एका ऑटोरिक्षाला धडक दिल्याने हा अपघात झाला. चारही मृत ऑटोरिक्षात बसले होते. या अपघातात एकजण गंभीर जखमी झाला असून त्याला औरंगाबादमधील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. औरंगाबाद-जालना मार्गावर हा अपघात बुधवारी सकाळी 9. 45 च्या सुमारास झाला. औरंगाबाद-जालना रोडवरील शेकटा गावाजवळ हा अपघात झाला.