Breaking News

मूकबधीर विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याची गरज आ. जगताप


अहमदनगर / प्रतिनिधी
माणसामध्ये देव पाहण्याची आपल्या संतांची शिकवण आहे. त्यानुसार दिव्यांगांना समाजाने मदतीचा हात दिला पाहिजे. मूकबधीर विद्यार्थ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन . संग्राम जगताप यांनी केले.
नगरसेवक कुमार वाकळे यांच्या वाढदिवसानिमित्त सावेडी येथील मुकबधीर विद्यालयास अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, नगरसेवक विनीत पाऊलबुधे, संपत बारस्कर, डॉ. सागर बोरुडे, अविनाश घुले, नगरसेविका मीनाताई चव्हाण, माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, दादासाहेब दरेकर, योगेश चिपाडे, मोहन गाडे, सारंग कराळे, सुरेश आडसूळ, अमीत खामकर, शरद महापुरे, दिलीप जगधने, संतोष काळे, विशाल वाकळे, प्रविण म्हस्के, संतोष वाटमोरे, निखील वाकळे, वैभव शिंदे, मुन्ना शेख, राम काते, नवनाथ कोलते, सनी वाकळे, रमेश वाकळे, प्रशांत बेल्हेकर आदी उपस्थित होते.