Breaking News

पळपुट्यांचा महाराष्ट्र कधीच नव्हता!

हिंदवी स्वराज्याची स्थापना करुन सुवर्णाक्षरात इतिहास लिहिणार्‍या छत्रपती शिवरायांच्या या भूमीला आजही सन्मानाने महाराष्ट्र देश असंच संबोधलं जातं. आमची महान संस्कृती, शौर्य व क्रांतीचा आमचा इतिहास  पाहिला तर हे एक राज्य म्हणून आमच्याकडे कधीही कुणी पाहिलं नाही तर महाराष्ट्र देश तथा महान राष्ट्र म्हणूनच आमचा आदराने उल्लेख होत राहिला. महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे शहर केवळ राज्याचंच नव्हे  तर देशाचं वैभव राहिलं आहे. जगभराला मुंबईचं आकर्षण कायम वाटत आलं आहे. मुंबईला आजही ‘आमची मुंबई’ असं मराठी माणूस अभिमानानं उर बडवत सांगत असतो. अलिकडील काळात मात्र आमची ही  महानता काहींच्या डोळ्यात खुपायला लागलीय. मुंबईचं लचकं तोडण्याचं धाडस कधी लपून तर कधी उघडपणे काही दळभद्री करु लागले आहेत. मुंबईच्या माध्यमातून महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचं हे मोठं  षडयंत्र असल्याचा वास याआधीपासूनच येथील समाजधुरिणांना येत होता. कधी माध्यमांमधून तर कधी कार्यक्रमांमधून त्यांनी तशी मत मांडून आमच्या राजकारण्यांचं या गंभीर प्रश्‍नाकडे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न  सुध्दा केला. परंतु, अलिकडील काळातील आमच्या स्वार्थी आणि भ्रष्ट राजकारण्यांकडून केवळ आपली खुर्ची शाबूत ठेवण्याचा प्रयत्न होत असल्याने महाराष्ट्राच्या अस्मितेकडे पाहण्यासाठी बहुधा त्यांना फुरसतच  मिळत नसावी. अलिकडील पाच-सहा वर्षांपासून अगदी उघडपणे महाराष्ट्राचे लचके तोडण्याचा उद्योग काही राजकारण्यांनी जोराने सुरु ठेवला आहे. येथील मोठे उद्योग इतर राज्यात स्थलांतरित होत आहेत ते के वळ इथल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे किंवा धोरणांमुळे नव्हे तर त्यांना तसे करणे भाग पाडले जात आहे. आम्ही करीत असलेला हा आरोप अगदीच निराधार नाही. रिझर्व्ह बँकेचं मुख्य कार्यालय सुध्दा गुजरातमध्ये  हलविणं हा सुध्दा महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचाच डाव असल्याचं उघडपणे बोललं जात आहे.
वाणगीदाखल ही काही उदाहरणं आहेत, असं म्हणता येईल. परंतु, मुंबईचं पर्यायाने महाराष्ट्राचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय हे कुणीही नाकारणार नाही. मग, हा उद्योग नेमकं करतयं तरी कोण? याचं उत्तर  महाराष्ट्रद्वेषी राजकारणी हेच आहे. राज्यातील सध्याचं राजकारण पाहता महाराष्ट्रद्वेषींना उचलू लागणारं हे राजकारण असल्याचं समोर येत आहे. पळपुट्या बंडखोरांचा हा महाराष्ट्र कधीच नव्हता. परंतु, सध्या मात्र  इथल्या राजकारणाला रुसव्या, पळपुट्या, स्वार्थी नेत्यांच्या बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे. यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील अशा ध्येयवेड्या, प्रामाणिक आणि निष्ठावंत राजक ारण्यांचा हा महाराष्ट्र आज नेमका कुठे चाललायं? राजकीय नेत्यांनी स्वार्थ व सत्तेच्या लालसेपोटी राजकीय निष्ठेलाच मूठमाती देण्याचा उद्योग सुरु केला आहे. आज एका पक्षात, उद्या दुसर्‍या पक्षात तर परवा  तिसर्‍याच पक्षात. राजकारण्यांच्या या माकडउड्या हे कधीही चांगल्या, सुजाण राजकारणाचा भाग होवूच शकत नाही. लोकप्रतिनिधींना जनतेच्या हिताची चाड असायला पाहिजे. किंबहुना राजकारण हे केवळ  जनतेच्याच हिताचं झालं पाहिजे. परंतु, राज्यातील आमच्या राजकारण्यांनी सध्या लोकभावनांचाच बाजार मांडल्याचे दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराजाचं नाव घ्यायचं, यशवंतराव चव्हाण यांचा विचार सांगायचा  मात्र प्रत्यक्षात बाजारु राजकारण करण्याचं पातक आमचे लोकप्रतिनिधी करताना दिसत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजे काय? तो कसा असला पाहिजे, यासंदर्भात स्व. यशवंतराव चव्हाण यांनी अत्यंत सुंदर विचार  मांडले होते. त्यासंदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासदादा पवार म्हणतात, लोकप्रतिनिधी म्हणजे नक्की काय?... तर, निवडणूक झाल्यानंतर आणि निवडून आल्यानंतर आपल्याला मते दिलेल्या आणि आपल्याला  मते न दिलेल्याही सर्वांसाठी चांगलं काम करणारा तोच खरा लोकप्रतिनिधी होय. मतदारांच्या भावनांशी आजचे आमचे लोकप्रतिनिधी कशा प्रकारे खेळताहेत हे गेल्या सहा महिन्यात झालेल्या राजकारणावरुन दिसून  आलंच आहे. त्यात आणखी वेगळं काही सांगण्याची गरज नाही.
आजच्या काळातील लोकप्रतिनिधींनी यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई, वसंतदादा पाटील यांच्यापासून थेट शेकापच्या गणपतराव देशमुख यांच्यासारख्यांचा किमान आदर्श घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजक ारणात शिरकाव झालेल्या भाजपाने येथे चांगलेच हातपाय पसरले आहेत. भाजपाचे राज्यातील लोकप्रतिनिधी केंद्रातील महाराष्ट्रद्वेष्ट्या नेत्यांच्या विचाराने चालत असावेत. त्यामुळेच केंद्रातील वरिष्ठांच्या मर्जीखातर  त्यांना हवे असलेले निर्णय घेण्याच्यादृष्टीने अनुषंगिक राजकारण करण्याचा प्रयत्न भाजपची मंडळी नेहमीच करीत आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपाने फोडाफोडीचं राजकारण करुन राष्ट्रवादी का ँग्रेसला मोठा धक्का दिला. पक्षनिष्ठेला तिलांजली देत केवळ सत्तेच्या स्वार्थापोटी राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपात गेले. विधानसभा निवडणुकीतही फोडाफोडीच्या राजकारणाने हैदोस घातला. सत्ता स्थापनेचा  महिनाभर राज्यात गदारोळ सुरु राहिला. भाजप-शिवसेनेचं बिनसल्यानंतर सत्ता स्थापन होत नसल्याचं पाहून शिवसेना-राष्ट्रवादी व काँग्रेसने एकत्र येवून सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सत्ता स्थापन क रण्याच्या आदल्या रात्रीत भाजपच्या  मंडळींनी घाणेरड्या राजकारणाचा प्रत्यय राज्यातील जनतेला दाखवून दिला. पुरेसं संख्याबळ जवळ नसतानाही मुख्यमंत्री म्हणून भल्या सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी शपथ  घेतली. त्यांना राष्ट्रवादीचे रुसवे, पळपुटे नेते अजित पवार यांनी साथ देत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. एका रात्रीत स्थापन झालेलं हे सरकार केवळ साडेतीन दिवसात बरखास्त झालं. तिन्ही पक्षांच्या महा विकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं आहे. हे सरकार लवकरात लवकर कसं पडेल यासाठी अजुनही भाजपाच्या मंडळींकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. पळपुट्या बंडखोरांचा महाविकास आघाडीच्या सरकारला  धोका वाटत आहे. आता महाविकास आघाडीचं सरकार पाच वर्षे स्थीर राहणं  जतनेच्या हिताचं  होईल. त्यासाठी आमच्या नेत्यांनी सतर्क राहिलं पाहिजे. याआधी राज्यात बंडखोरी जरुर झाली आहे. परंतु, आता ती  ज्या प्रमाणात होत आहे, तेवढ्या प्रमाणावर याआधी ती नक्कीच झाली नव्हती. भाजपाने मराठी, ओबीसी नेत्यांना खड्यासारखं बाजुला केलंय. तरी सुध्दा आमच्या नेत्यांचे डोळे उघडत नाहीत. स्वार्थापायी महाराष्ट ्राचा घात करण्याचं पातक आमचीच मंडळी करीत आहेत. महाराष्ट्राचं अव्वल स्थान अबादित राखायचं असेल तर आमच्या मंडळींनी पळपुटेपणा व बंडखोरी न करता राज्याचं, येथील जनतेचं हित डोळयासमोर  ठेवावं.