Breaking News

देशाची अर्थव्यवस्था मोजतेय शेवटची घटका : पी.चिदंबरम

P Chidambaram
नवी दिल्ली
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीवर केलेल्या वक्तव्याच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मंगळवारी भाजपवर निशाणा साधला. आता देशाच्या अर्थव्यवस्था शेवटची घटका मोजत असून, या अर्थव्यवस्थेला आता देवच वाचवू शकतो, असा टोला त्यांनी लगावला आहे.
त्यांनी ट्विटमध्ये म्हटले की, जीडीपीच्या आकड्यांना काही अर्थ राहिलेला नाही. वैयक्तिक करात कपात होईल, आयात शूल्कात वाढ केली जाईल. सुधारणेबाबत भाजपचे हे विचार आहेत. भारताच्या अर्थव्यवस्थेला देवच वाचवेल.  दरम्यान, कॉर्पोरेट करातील कपातीशी संबंधित संशोधन विधेयकावर चर्चेदरम्यान दुबे यांनी सोमवारी लोकसभेत जीडीपाली रामायण, महाभारत मानने योग्य नसल्याचे म्हटले आणि भारतासाठी जीडीपी काही कामाचे नसल्याचेही त्यांनी म्हटले होते. भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी लोकसभेत बोलताना जीडीपीला बायबल, रामायण आणि महाभारत मानण्याची गरज नसल्याचे म्हटले. वर्ष 1934 मध्ये जीडीपी लागू झाली. त्यापूर्वी जीडीपी नव्हते. फक्त जीडीपीलाचा बायबल, रामायण आणि महाभारत मानणे सत्य नाही. भविष्यातही जीडीपीचा जास्त काही उपयोग होणार नाही. सामान्य व्यक्तीचा आर्थिक विकास होत आहे किंवा नाही हाच आजचा नवा सिद्धांत आहे. विकासात सातत्य आहे की नाही, हेच जीडीपीपेक्षा महत्त्वाचे आहे, असे दुबे यांनी म्हटले होते. जीडीपी आणि अर्थव्यवस्थेविषयी बोलताना भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी जीडीपीचा फार उपयोग होणार नसल्याचे म्हटले होते. त्यावरून काँग्रेसने भाजपावर सडकून टीका केली आहे. यावर माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिंदबरम म्हणाले, जीडीपीचे आकडे विसंगत आहेत. वैयक्तिक कर कपात होणार आहे. आयात शुल्क वाढणार आहे. देवानंच भारतीय अर्थव्यवस्थेला वाचवावं, अशी मार्मिक टीका चिंदबरम यांनी केली आहे. चिंदबरम यांच्याबरोबरच काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनीही दुबे यांच्या निर्णयावर ट्विट करून टोला लगावला आहे. देवा आम्हाला नव्या भारतातील अशा नवशिक्या अर्थशास्त्रज्ञांपासून आम्हाला वाचव, असं सुरजेवालांनी म्हटलं आहे. सरकारने दुसर्‍या तिमाहीतील आकडे जाहीर केले होते. आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळया पातळयांवर प्रयत्न सुरु आहेत. तरीही विकास दराला गती मिळू शकलेली नाही. कृषी, उत्पादन आणि सर्व्हिस सेक्टरमध्येही घट झाली आहे. दुसर्‍या तिमाहीत विकास दर घटून 4.5 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या सहा वर्षात विकास दर सर्वात खालच्या स्तरावर पोहोचला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर 5 टक्के होता.