Breaking News

शेंडी विद्यालयाच्या मॉडेलची जिल्हास्तरावर निवड
अहमदनगर/प्रतिनिधी
 चालू शेक्षणिक वर्षातील तालुकास्तरीय विज्ञान-गणित प्रदर्शनात अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू इंग्लिश स्कूल,शेंडी विद्यालयाने घवघवीत यश मिळवले. विद्यालयाने तयार केलेल्या मॉडेलची जिल्हास्तरावर होणाऱ्या प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. या स्पर्धा पिंपळगाव माळवी या ठिकाणी पार पडल्या. यामध्ये विद्यालयाने हवा, पाणी यावर चालणारे कुट्टी मशीन तयार केले होते.
 या प्रदर्शनात २०० स्पर्धक सहभागी झाले होते. यात न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी  हवा, पाणी यावर चालणारे कुट्टी मशीन तयार केले होते. विजेची पर्यायाने पर्यावरणाची बचत तसेच शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात चालणारी ही यंत्रणा तयार केली होती. याची उपयुक्तता पाहत परीक्षकांनी या मॉडेलची जिल्हा स्तरावर निवड केली. या विद्यार्थ्यांना गणित विज्ञान शिक्षक शेख एन. एम., मोढवे .एस., एकलहरे एस.जे., धाडगे के.एल., एकशिंगे एन.बी., पायमोडे आर.के. आदींचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक कांडेकर बी.डी., पर्यवेक्षक गोबरे व्ही.एच.,शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे.