Breaking News

लहुजी सेनेचे पाथर्डी नगरपालिकेत आंदोलनपाथर्डी/प्रतिनिधी
 नगरपालिकेचा जेसीबी गायब झाल्याबाबत सात दिवसांपूर्वी पालिकेला निवेदन देऊनही नगरपालिकेने कुठलीही दखल घेतली नसल्याने लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगरपालिका कार्यालयात आंदोलन करण्यात आले.  यावेळी सुभाष घोरपडे, आनंद पवळे, मुरली दिनकर, लक्ष्मीताई काळोखे, रेखा काळोखे, मंदाबाई उकिरडे, संजय ससाणे, सीताबाई काकडे, जालिंदर काळोखे, पोपट शिरसाठ, आनंद उबाळे, शैलेश शिरसाठ, अर्जुन ससाने, दत्ता बिडवे, देविदास भारस्कर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.होते.
 जेसीबी गायब करणाऱ्या संबंधितावर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा, अन्यथा नगरपालिकेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन लहुजी शक्ती सेनेच्या वतीने करण्यात येईल असा इशारा यापूर्वी संघटनेने दिला होता. परंतु यावर कारवाई झाली नाही. त्यामुळे सादर आंदोलन करण्यात आल्याची माहिती संघटनेच्या वतीने देण्यात आली.  नगरपालिकेचा जेसीबी बऱ्याच वर्षापासून गायब आहे कार्यालयीन प्रक्रिया न करता नगरपालिकेमधून गायब झालेला आहे. तरी अद्याप पर्यंत जेसीबीचा तपास लागलेला नाही. त्यामुळे याबाबत गुन्हा दाखल करण्यात यावा अन्यथा अन्यथा पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुभाष घोरपडे यांनी यावेळी दिला.