Breaking News

कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डॉ. आंबेडकर रुग्णालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकेशन बदलले?


भिंगार / प्रतिनिधी
कॅंटोन्मेंट बोर्डाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटलमधील सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे 'लोकेशन' बदलण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल यांच्या ओपीडीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे लोकेशन बदलण्यात आले आहे. हे बदलण्यासाठी कोणाची परवानगी घेण्यात आली आणि कॅमेऱ्याचे लोकेशन बदलविवण्याचे कारण काय, असे गंभीर मुद्दे यानिमित्ताने भिंगारवासियांमध्ये उपस्थित होत आहेत.
कॅंटोन्मेंट बोर्डाच्या डोॅ. आंबेडकर हॉस्पिटलमधील २५ कर्मचाऱ्यांना वैद्यकीय अधिकारी डॉ. जयस्वाल यांनी पैसे जमा करण्यासाठी एक बेकायदा नोटीस जारी केली होती. त्या प्रकरणाचा खुलासा अद्यापपर्यंत डॉक्टर जयस्वाल कॅन्टोन्मेंट बोर्डाचे चिफ एझिकेटीव ऑफिसर विद्याधर पवार यांनी केलेला  नसतानाच ही दुसरी गंभीर बाब उघडकीस आली आहे. डॉ. जयस्वाल यांनी दवाखान्यातील त्यांच्या ओपीडीमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून तो इतरत्र हलवण्याला आहे. कँटोन्मेंट बोर्ड तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती विनीता देशपांडे यांनी त्यावेळी कारभार पारदर्शक व्हावा कर्मचारी काम व्यवस्थित काम करतात की नाही यावर नियंत्रण ठेवण्यासाठी    पाहण्यासाठी त्यावेळेस सीसीटीव्ही कॅमेरे हॉस्पिटलमध्ये  बसविले होते. कॅमेरे बसविल्यानंतर कॅमेऱ्याच्या धाकाने हॉस्पिटलमधील कामकाज   व्यवस्थित चालु होते. ठरवून दिलेल्या जागेमध्ये कॅमेरे बसविल्यानंतर हॉस्पिटलमधील कामकाज सर्व व्यवस्थित चालू होते. सीसीटी कॅमेरावर कारभार व्यवस्थित चालतो की नाही, हे पाहण्याची व्यवस्था होती. परंतु देशपांडे यांची बदली झाल्यानंतर डॉ. जयस्वाल यांनी त्यांच्या स्वार्थापोटी प्रशासनाने ज्या जागा ठरवून दिलेल्या होत्या त्या जागेतील कॅमेर्यांचे जागेत बदल केला आहे. स्वतःचा अपारदर्शक कारभार लपविण्यासाठी हा प्रकार झाल्याचे उघडकीस आलेले आहे. खात्री चौकशी करण्यासाठी प्रशासनाने ज्या कंपनीला ते काम दिले होते, त्यांच्याकडून माहिती घ्यावी तशी त्याची दप्तरी नोंदही असेलच. त्याच्यात कॅमेरे  कुठे कुठे बसविले, किती बसवले आणि कोणत्या जागेत  बसविले आहेत, याची नोंद सापडेल. हॉस्पिटलमधील निवासी डॉक्टर जयस्वाल यांनी दवाखान्यातील त्यांच्या केबिनमधील सीसीटीव्ही कॅमेरा बंद करून तो इतरत्र हलवण्यात आलेला आहे. त्या  कॅमेऱ्याच्या लोकेशनमध्ये बदल करण्यामागचा उद्देश काय, याचीसुद्धा खात्री करणे प्रशासनाची जबाबदारी आहे. हॉस्पिटलमधील कॅमेरे जागा बदलण्यासाठी कोणाची परवानगी घेतलेली आहे का आणि जर घेतली असेल तर ते कोणत्या अधिकाऱ्याची परवानगी घेतली आहे, स्वतःचा  अपारदर्शक कारभार लपविण्यासाठी की स्वतःच्या स्वार्थासाठी केला आहे का, किंवा त्यांना तशी करण्याबाबत  कोणी परवानगी दिली आहे का,  त्या कॅमेऱ्याचा जागेत बदल करून ते बंद  का करण्यात आले, याचाही खुलासा होणे महत्त्वाचे असून भिंगारचे तमाम नागरिक या खुलाशाच्या प्रतीक्षेत आहेत.