Breaking News

समाजकल्याण अधिकारी उबाळे यांचा गौरव


अहमदनगर/प्रतिनिधी : दिव्यांग बांधवांसाठी विविध कल्याणकारी योजना राबवून त्यांना आधार देण्यास प्रयत्नशील असलेले जिल्हा समाजकल्याण अधिकारी नितीन उबाळे यांचा सावली दिव्यांग कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने गौरव करण्यात आला. 
यावेळी भिंगार कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी विद्याधर पवार, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजीत दिवटे, समाजकल्याण दिव्यांग विभागाचे दिनकर नाटे, सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे, उपाध्यक्ष चांद शेख, बाहुबली वायकर, नवनाथ औटी, संभाजी कुठे आदी उपस्थित होते.
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून जिल्हा समाजकल्याण विभाग जिल्हा परिषद व जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय दिव्यांग मुलामुलींचे क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उबाळे यांचा गौरव सोहळा झाला.