Breaking News

आसामवर संघाचे आक्रमण होऊ देणार नाही काँगे्रस नेते राहुल गांधी यांची टीका


गुवाहाटी/लखनौ : आसामचा कारभार येथील आसामची जनताच हाकेल, येथील संस्कृतीवर आम्ही भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आक्रमण होऊ देणार नाही. येथील जनतेवर नागपूरचे प्रस्थ चालणार नाही, अशा कठोर शब्दात काँगे्रसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. गुवाहाटी येथे नागरिकत्व कायद्याविरुद्ध आयोजित मेळाव्यात राहुल गांधी बोलत होते.
यावेळी बोलतांना राहुल गांधी म्हणाले की, देशातील हिंसक आंदोलनांचा दाखला देत देशात पुन्हा एकदा नोटबंदीनंतर जशी परिस्थिती निर्माण झाली होती तशीच स्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. सध्या देशात जे काही घडत आहे त्यामागे भाजप सरकारचा कुटील डाव आहे. लोकांना आपसात लढवण्यासाठीच हे सगळं सुरू आहे. हे जिथे जातात तिथे केवळ द्वेष पसरवण्याचेच काम करतात, असे राहुल म्हणाले. आसाममध्ये भाजपचा हा डाव यशस्वी होणार नाही. द्वेष आसामला मान्य नसून येथील जनता शांततेचा मार्ग चोखाळून सलोखा जपूनच पुढे मार्गक्रमण करेल, असे राहुल म्हणाले.