Breaking News

ओबीसींनी सत्तापरिवर्तन केले : डॉ. सोनवणे


अहमदनगर  (प्रतिनिधी)
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ ही एका विशिष्ट समाजापर्यंत मर्यादित राहिल्याने ओ. बी. सी. ची फार मोठी पिछेहाट झाली आहे आणि उशीर झाला आहे. ओबीसी प्रवर्गात देवाण घेवाण झाली पाहिजे. ओबीसींनी देशाचे सत्तापरिवर्तन केले आहे, असे प्रतिपादन दैनिक लोकमंथन'चे मुख्य संपादक व  ओबीसी चळवळीचे मार्गदर्शक डॉ. अशोकराव सोनवणे यांनी
अहमदनगरमध्ये ओबीसी सेवा संघाचे राज्यव्यापी भव्य अधिवेशन रविवारी दि.  २२ रोजी 
शहरातील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ओबीसी सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनियर प्रदीप ढोबळे होते. या अधिवेशनात बोलताना ओबीसी सेवा संघाचे राज्य महासचिव ज्ञानदेव खराडे म्हणाले, ओबीसीशिवाय कोणताच पक्ष राजकारण करू शकत नाही, हे केव्हाच स्पष्ट झालेले आहे. ओबीसी संघटन अहमदनगर जिल्ह्यामध्ये मजबूत करणार आहोत. अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय अध्यक्ष इंजिनिअर प्रदीप ढोबळे यांनी ओबीसी सेवा संघाच्या स्थापनेपासूनचा संघर्ष उलगडून दाखवला. ओबीसी सेवा संघाचे कार्य स्पष्ट करून ओबीसींना संविधान वादी बनण्याचे आवाहन त्यांनी केले. अधिवेशनातून ऊर्जा घेऊन जाण्याचे आवाहन केले.
गुरव समाजाचे डॉक्टर प्रल्हाद वडगावकर यांना ओबीसी सेवा संघाच्यावतीने " कर्मवीर पुरस्कार" प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना वडगावकर यांनी ओबीसीचा राजकीय पक्ष स्थापन करण्याचे आवाहन केले . या अधिवेशनात कार्याध्यक्ष नरेंद्र गद्रे गुळाजी  काजिेडेकर, नितीन बुटी, जि. प. सदस्य शरद झोडगे, सचिन गुलदगड, प्रथम महापोैर भगवान फुलसौंदर, कुंभार समाज अधक्ष विनय देवतरसे,  डी. ए. दळवी, दिगंबर ढवन, अंबादास गारूडकर, अशोक सब्बन, बळीराम चौरे, जे. के. जाधव, विष्णुपंत गवळी, संतोष बनकर, आबा लोंढे, रवींद्र राऊत, उत्तरेश्वर मोहोळकर, गुरव समाज अध्यक्ष प्रतापराव गुरव आदी उपस्थित होते. विष्णुपंत गवळी यांनी आभार मानले.