Breaking News

साईदर्शनाचे पासेस काऊंटर बंदशिर्डी /प्रतिनिधी
 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आज (२६ डिसेंबर) कंकणाकृती सुर्यग्रहणामुळे सकाळी ते सकाळी ११ यावेळेत दर्शनासाठी समाधी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. याकालावधीत मोफत बायोमॅट्रीक दर्शन पासेस काऊंटर जनसंपर्क विभागाकडील सशुल् व्हिआयपी दर्शन पासेस काऊंटर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख् कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
 मुगळीकर म्हणाले, दिनांक २६ डिसेंबर २०१९ रोजी सकाळी .०५ ते सकाळी ११ याकाळात कंकणाकृती सुर्यग्रहण आलेले आहे. त्यामुळे श्री साईबाबा समाधी मंदिराच्या दैनंदिन कार्यक्रमांमध्ये बदल करण्याबाबतचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतला आहे. यामध्ये सकाळी वाजता श्रींचे दर्शन बंद होईल, सकाळी .०५ वाजता समाधी मंदिरात मंत्रोच्चार सुरु होईल,सकाळी ११ वाजता मंत्रोपच्चार संपल्यानंतर श्रींचे मंगलस्नान होईल. दुपारी १२.३० वाजता मध्यान् आरती झाल्यानंतर दर्शन सुरु होईल.