Breaking News

महाविकास आघाडीच्या कामकाजाला भाजपा आव्हान देणार

Fadanvis
मुंबई
विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदासाठी महाविकासआघाडीकडून काँग्रेस नेते नाना पटोले आणि भाजपकडून किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी आज सभागृहात कामकाज सांभाळलं. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारला बहुमत चाचणीच्या अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागणार आहे. दुपारी 2 सुमारास यासाठीच्या अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी हे अधिवेशन नियमबाह्य आहे अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी विधानभवनात गदारोळ झाला. यानंतर भाजपच्या नेत्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजीही केली.
देवेंद्र फडणवीस विधानभवनात आपले मत मांडताना बोलत होते. यावेळी त्यांनी हे अधिवेशन नियमबाह्य आहे अशी टीका केली. यावेळी विधानभवनात गदारोळ झाला. यावेळी ‘दादगिरी नहीं चलेगी दादगिरी नहीं चलेगी’ असे म्हणत भाजपच्या नेत्यांनी घोषणा दिल्या. यावेळी हंगामी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी सर्वांना शांत करत परिस्थिती हाताळली.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?
अधिवेशन नियमबाह्य असल्याची टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्हाला रात्री उशीरा कळवले जाते की, उद्या बहुमत चाचणी आहे आणि त्यासाठी अधिवेशन आहे. बहुमत आहे तर अधिवेशन एवढ्या उशीरा बोलवण्याची गरज का पडली आमचे आमदार उपस्थित राहू नये म्हणून हे सगळं केलं का ? हे अधिवेशन नियमाला धरून बोलावलं नाहीये. राज्यापालांनी यासंदर्भात समन्स बजावणे गरजेचे आहे.” असे फडणवीसांनी म्हटले.