Breaking News

शिवबा संघटनेकडून लोहगडावर स्वच्छता मोहीमपिंपळनेर/प्रतिनिधी ः
पारनेर तालुक्यातील शिवबा संघटनेच्या वतीने लोणावळा येथील लोहगडावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
      मोहिमेत शिवबा संघटनेच्या तरुणांसह लहान मुलेही सहभागी झाले होते. चित्रकलाप्रेमी ज्ञानेश्‍वर कवडे स्वच्छता मोहीमेमध्ये भाग घेऊन प्रत्येक मोहिमेचे चित्र रेखाटतात. कृष्णा कवडे, संजोग लामखडे, सुजल लामखडे, ईश्‍वरी वरखडे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, मच्छिंद्र लाळगे, शंकर लामखडे, रोहिदास लामखडे, राजू लंके, नवनाथ लामखडे, प्रकाश कुंभार, सोमा भाकरे, योगेश वाळुंज, राजू लाळगे, लहू गागरे, कुमार नाणेकर महाराज, नवनाथ बरशिले, शंकर वरखडे, गणेश लंके, सचिन कोतकर, बाबू व्यवहारे, रवी शेटे, सुरज शिरसाट, जयराम सरडे, गणेश चौधरी, दत्ता टोणगे, खंडू लामखडे, स्वप्नील लामखडे, शैलेश ढवळे, अंकुश वरखडे, नीलेश वरखडे, नौशाद पठाण, किरण शिंदे, शांताराम पाडळे स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
 शिवबा संघटनेकडून दर महिन्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबवली जाते. शिवनेरी, तोरणा, पुरंदर, रायगड, निघोज कुंड पर्यटन क्षेत्र स्वच्छता, कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी मदत अशा मोहिमा राबवण्यात आल्या आहेत.