Breaking News

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पेटला बेळगावात मराठी फलक तोडले, कोल्हापुरात पडसाद


कोल्हापूर ः बेहगावमध्ये भाषिक मुद्द्यावरुन वातावरण चांगलेच तापले आहे.   कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर पाटील याच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर बेळगावमधील मराठी भाषिक आणि शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यानंतर शिवसैनिकांनी भीमाशंकर यांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्यानंतर संतप्त झालेल्या कन्नड संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बेळगावातील दुकानांवर असलेले मराठी फलक तोडून टाकले. त्यामुळे महाराष्ट्र-सीमावाद भडकण्याचे संकेत मिळत आहे.
सीमाप्रश्‍नाच्या वादाच्या पार्श्‍वभूमीवर महाराष्ट्र- कर्नाटक बस सेवा तात्पुरत्या स्वरुपासाठी बंद ठेवण्यात आल्या आहेत. सध्याच्या घडीला भाषिक वाद पेटला असून खबरदारीच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोल्हापूरहून कर्नाटकच्या दिशेने जाणार्‍या आणि कर्नाटकातून कोल्हापूरच्या दिशेने येणार्‍या प्रवाशांना काहीकाळ त्रास सहन करावा लागणार आहे. बेळगावमध्ये शहापूर बसवान गल्लीत रविवारी सकाळी एका चहाच्या दुकानावरील मराठी फलकावर दगडफेक करून नुकसान करण्यात आले होते. महापालिकेने त्रीभाषा धोरणाचा अवलंब केला आहे. त्यामुळे मराठीसह कन्नड व इतर भाषांचाही वापर करता येतो. पण मराठीचे प्राबल्य काही मराठीद्वेष्ट्यांना खटकत असून त्याच असुयेतून काहींनी अंधाराचा फायदा घेत मराठी फलकावर दगडफेक करण्यात आली होती.