Breaking News

पंकजा मुंडे यांची नाराजी भाजपकडून दूर

विनोद तावडे यांनी घेतली रॉयलस्टोन बंगल्यावर भेट

Munde Tawade
 मुंबई
भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या नाराज असून, त्या बंडाच्या तयारीत असल्याच्या चर्चांनी जोर धरल्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून मुंडे यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न करण्यात येत होते. अखेर मंगळवारी पंकजा मुंडे यांनी बंडखोरी आपल्या रक्तात नसल्याचे स्पष्ट करत आपले बंड म्यान केले.
भाजपाचे नेते बबनराव लोणीकर यांनी मंगळवारी दुपारी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, असेही ते म्हणाले. लोणीकर यांच्या भेटीनंतर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे हे पंकजा यांची भेट घेण्यासाठी रॉयलस्टोन या शासकीय बंगल्यावर आले आहेत. तावडे यांच्याबरोबर माजी राज्यगृहमंत्री राम शिंदे हे बरोबर असल्याचे समजते. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला त्यांची कन्या माजी मंत्री पंकजा मुंडे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. पंकजा मुंडे यांनी  फेसबुक पोस्ट लिहून पुढचा प्रवास ठरणार असल्याची माहिती आपल्या समर्थकांना दिली होती. तर सोमवारी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन भाजपच चित्र गायब असल्याचे दिसून आले. यासर्व घडामोडीनंतर त्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा राज्यभरात सुरु झाल्या होत्या. अखेर मंगळवारी भाजप नेते विनोद तावडे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. तावडे यांनी रॉयलस्टोन या शासकीय निवासस्थानी पंकजा मुंडे यांची भेट घेत चर्चा केली. मात्र यावेळी भाजपकडून पंकजा मूंडे यांना कोणते आश्‍वासन देण्यात आले आहे, याबद्दल अद्याप माहिती समोर आलेली नाही. मात्र पंकजा मुंडे यांना विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेतेपद किंवा प्रदेशाध्यक्षपद पाहिजे आहे. त्यासाठीच त्यांच्याकडून भाजपवर दबावतंत्राचा वापर करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.  मंगळवारी भारताचे पहिले राष्ट्रपती भारतरत्न डॉ. राजेन्द्र प्रसादजी यांची आज जयंती असून त्यांना अभिवादन करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी एक चित्र पोस्ट केलं आहे. या चित्रात डॉ. राजेन्द्र प्रसादजी यांच्या फोटोसह त्यांनी भाजपाच्या कमळाचाही फोटो समाविष्ट केला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पक्षांतराच्या चर्चेला पूर्णविराम दिल्याचे बोलले जात आहे. मात्र पंकजा मुुंडे यांनी माध्यमांसमोर येत आपण भाजपमध्येच राहणार असल्याचे अजूनही स्पष्ट केलेले नाही.
दरम्यान, महाविकास आघाडीमुळे भाजपाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही भाजपाला फटका बसण्याची स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक निवडणुकीसाठी वेगळी समीकरणे करण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून 11 ते 12 बंडखोर उमेदवार विनोद तावडे आणि एकनाथ खडसेंच्या संपर्कात आहेत. या दोन्ही नेत्यांनी विधानसभेचे तिकीट नाकारण्यात आले होते. त्यामुळे या बंडखोर उमेदवारांची समजूत खडसे आणि तावडे यांना काढावी लागणार आहे. सत्ता गेल्यानंतर भाजपामध्ये काही गट नाराज असल्याचे सांगितले जात आहे. पंकजा मुंडे यांनी केलेली फेसबुक पोस्ट या नाराजीतूनच समोर आली असल्याचं बोललं जातंय. 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर लोकांना येण्याचं आवाहन केलं आहे. पण त्याचसोबत पुढे काय करायचं? कोणत्या मार्गाने जायचं? हे ठरवूया असं सांगितल्याने पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देणार का असा सवाल उपस्थित झाला. पण पंकजा मुंडे भाजपातच राहणार असून त्यांच्याबद्दल बातम्या पसरवू नका असं भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.


‘माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास’
भाजपच्या नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुवर केलेली पोस्ट आणि फेसबुक पेजवरुन भाजपचे नाव, चिन्ह गायब झाल्यामुळे ते नाराज असून पक्षांतराच्या तयारी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या. या फेसबुक पोस्टनंतर पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या फेसबुक पोस्टचा विपर्यास करण्यात आला. भाजप सोडण्याबाबत अफवा पसरवल्या गेल्या. मी पक्षाची सच्ची कार्यकर्ती असून बंडखोरी माझ्या रक्तात नाही, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.  फेसबुकवर केलेली पोस्ट दबावतंत्रासाठी केली नाव्हती, असे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे. मला आत्मचिंतनासाठी आणि माझ्या लोकांशी बोलण्यासाठी वेळ हवा आहे. तसंच मला कोणतेही पद मिळू नये यासाठी हे प्रयत्न सुरु असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले.


पक्षातील कारवायांमुळेच पंकजा मुंडे आणि रोहिणी खडसेंचा पराभव

भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी भाजपाला पुन्हा घरचा आहेर दिला आहे. खडसे यांच्या कन्या रोहिणी आणि भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. याबाबत एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट केले आहे. ‘पक्षांतर्गतच काही लोकांनी पक्षाच्या उमेदवारांविरुद्ध कारवाया केल्या आणि त्यांना पाडण्याचा प्रयत्न केला गेला. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पराभव झाला. फक्त पंकजाच नव्हे तर रोहिणी खडसे यांनाही अशाच प्रकारे पाडण्यात आले’, असे एकनाथ खडसे म्हणाले. म्हणाले आहेत.