Breaking News

आ.रोहित पवारांना मंत्रिपदाची संधी द्या कर्जतच्या शिष्टमंडळाची मागणी कर्जत/प्रतिनिधी
  आमदार रोहित पवार यांचा राज्याच्या मंत्रिमंडळात समावेश करावा, अशी मागणी कर्जत येथील शिष्टमंडळाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे. या शिष्टमंडळात नानासाहेब निकत, अशोक जायभाय, सुनील शेलार, राहुल अनारसे यांचा समावेश होता.
  पवार यांना देण्यात आलेल्या निवेदनात शिष्टमंडळाने म्हटले आहे की, आमदार रोहित पवार यांना राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये संधी द्यावी. रोहित पवार हे अतिशय अभ्यासू आमदार आहेत. सर्वसामान्य गोरगरीब जनता, महिला, युवक, शेतकरी या सर्वांच्या प्रश्‍नांची त्यांना जाण आहे. त्यांना मंत्रिमंडळात संधी मिळाल्यास कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या विकासाला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. शैक्षणिक सुविधा, एमआयडीसी, रोजगार, एसटी डेपो, कुकडी, सीना पाणी असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. हे प्रश्‍न सोडविण्यासाठी रोहित पवार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या समावेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला नगर जिल्ह्यात मोठा फायदा होईल. मतदारसंघात अनेक वर्षे भाजपाची सत्ता होती. येथील जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी आ. पवार यांना संधी मिळावी.