Breaking News

'मराठा सोयरीक'चा शनिशिंगणापूरला राज्यस्तरीय वधू वर मेळावा


नेवासा / प्रतिनिधी
'मराठा सोयरीक' या व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून येत्या रविवारी दि. २९ रोजी शनिशिंगणापूर येथे विनामूल्य राज्यस्तरीय मराठा वधू वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विनामूल्य अशा या सेवेत मराठा समाजातील विवाह जुळण्यासाठी प्रयत्न केले जातात, आत्तापर्यंत अहमदनगर जिल्ह्यात अकराशे
पेक्षा अधिक विवाह जुळले असून याही वर्षी सालाबादप्रमाणे शनिशिंगणापूरला मराठा वधू वर थेट-भेट मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मेळाव्याच्या स्वागताध्यक्षा संपदा दिवटे आणि डॉ. उषा मोरे यांनी दिली.
       त्या म्हणाल्या, सोशल मीडियाच्या गैरवापराबाबत अनेक तक्रारी केल्या जातात. परंतु नेवाशाचे जयकिसन वाघ यांनी या माध्यमाचा विवाह जुळण्यासाठी वापर केला. मे २०१६ मध्ये त्यांनी अहमदनगर जिल्ह्यासाठी मराठा सोयरिक ग्रुपची सुरुवात केली. याच बरोबर आता सद्यस्थितीला राज्यातील ३६ जिल्हे आणि ३१० तालुक्यांसाठी बुलढाण्याचे सुनीलराव जवंजाळ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र ग्रुप तयार केलेले आहे. ग्रुपमध्ये विवाहोत्सुक  मुला-मुलींच्या कुटुंबीयांना ॲड केले जाते. २०१७ मध्ये शनिशिंगणापूर मध्ये झालेल्या पहिल्या मेळाव्यात ४३ वधू-वरांचे विवाह जुळवण्यात सोयरीक ग्रुपला यश आले.
दरम्यान, श्रीक्षेत्र शनिशिंगणापुर येथील बहुउद्देशिय सभागृहात सुनिता गडाख शनैश्वर देवस्थाच्या अध्यक्षा अनिता शेटे, गंगापूरच्या नगराध्यक्षा सुवर्णा जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विनामुल्य राज्यस्तरीय मराठा वधु वर मेळावा होणार आहे.
मेळावा यशस्वी करण्यासाठी, माया जगताप, शितल चव्हाण, अयोध्या जगताप, रजनी गोंदकर, संजीवनी दाणी, राजश्री मिसाळ, सिमा मडके, आशा साठे मंदा निमसे, रोहिणी वाघमारे, सुवर्णा आळंदकर, वैशाली कडलग, कुंदा गुंजाळ, नंदा वराळे, मनिषा वाघ, सुरेखा सरमाने, संगिता जोरवार, आदींसह आबासाहेब राऊत, हरीभाऊ जगताप, आसाराम नलगे, पंडीतराव खाटीक, चंद्रकांत नवले, जनार्दन कदम, चंद्रशेखर गुंजाळ, अशोकराव ढोले, बाळासाहेब भोर, अशोक दाणी, लक्ष्मण मडके, राजेश सरमाने, वसंत  मुठे, नानासाहेब जाधव आदी प्रयत्नशील आहेत.