Breaking News

शस्त्रसंधीचे उल्लंघन; दोन पाकिस्तानी सैनिक ठार


नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमध्ये सीमारेषेवर पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. वारंवार बजावून देखील पाकिस्तानने आपल्या कुरपती थांबलेल्या दिसत नाही. आज देखील पाकिस्तानकडून सीमारेषेवर गोळीबार झाला. यावेळी भारतीय जवानांनी दिलेल्या चोख प्रत्युत्तरात पाकिस्तानचे दोन सैनिक ठार झाले. शिवाय पाकिस्तानी सैनिकांचे एक तळ देखील उद्धवस्त करण्यात आल्याची माहिती आहे. पलांवाला सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते. ज्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले व दोन पाकिस्तानी सैनिकांना ठार करण्यात आले. भारतीय जवानांकडून करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानी सैनिकांचे एक तळ देखील उद्धवस्त झाले.