Breaking News

'डॉ. विखे'चा माजी विद्यार्थी 'आकाश क्षेपणास्त्र'च्या प्रोजेक्ट डायरेक्टरपदी

अहमदनगर / प्रतिनिधी
डॉ. विठ्ठलराव विखे पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स ॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागातील १९९२ सालचे माजी विद्यार्थी नरेंद्र व्ही. काळे यांची आकाश क्षेपणास्त्र एम. के. च्या प्रोेजेक्ट डायरेक्टरपदी निवड झाली आहे. काळे हे सध्या 'डिफेन्स रिसर्च ॅण्ड डेव्हलमेंट ऑर्गनायझेशन' (डी.आर.डी..) हैदराबाद येथे रिसर्च सायंटीस्ट म्हणून कार्यरत आहेत. ते मूळचे माळीवाडा, अहमदनगर येथील रहिवासी आहे. त्यांचे हे भरघोस यश महाविद्यालयासाठी इलेक्ट्रॉनिक्स ॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागासाठी अभिमानास्पद आहे. याबद्दल डॉ. अनिता पाटील, विभागप्रमुख ॅण्ट टी. सी. यांनी त्यांचे अभिनंदन केले उज्वल भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, संस्थेचे अध्यक्ष . राधाकृष्ण विखे, मुख्य कार्यकारी अधिकारी खा. डॉ. सुजय विखे, संस्थेचे सेक्रेटरी जनरल डॉ. बी. सदानंदा, विखे मेमोरियल हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचे उपसंचालक डॉ. अभिजित दिवटे डायरेक्टर (टेक्निकल) डॉ. पी. एम. गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उदय पी. नाईक डेप्युटी डायरेक्टर टेक्निकल सुनिल कल्हापुरे यांनी त्यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन केले.