Breaking News

नौदलात फेसबुक वापरावर बंदी

नवी दिल्ली : सोशल मीडियाद्वारे शत्रूच्या गुप्तचर संस्थांना माहिती पुरवण्याचे कारस्थान उघड झाल्यानंतर नौदलात फेसबुक वापरावर बंदी टाकण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच विशाखापट्टणम येथे नौदलाच्या सात जवानांना नौदलाची संवेदनशील माहिती सोशल मीडियाद्वारे शत्रूच्या गुप्तचर संस्थांना पुरवताना पकडण्यात आले होते, या घटनेनंतर नौदलाकडून हे कठोर पाऊल उचलण्यात आले. नौदलाने मेसेजिंग अ‍ॅप, नेटवर्किंग आणि ब्लॉगिंग, कंटेट शेअरिंग, होस्टिंग, ई-कॉमर्स साईट्सवर देखील बंदीची घालल्याचे सांगण्यात आले आहे. आंध्रप्रदेश पोलिसांनी 20 डिसेंबर रोजी पाकिस्तानच्या संपर्कात असलेले व हेरगिरी करणारे एक रॅकेट उद्धवस्त केलं. याप्रकरणी नौदलाच्या सात जवानांना अटक केली होती. आंध्रपदेश पोलिसांच्या गुप्तरच विभागाने केंद्रीय गुप्तचर संस्था व नौदलाच्या गुप्तचर विभागाच्या मदतीने ‘ऑपरेशन डॉल्फिन्स नोज’ राबवत हे रॅकेट उद्धवस्त केले होते.