Breaking News

घारगाव येथे एनएनएसचे श्रमसंस्कार शिबीर कोळगाव/प्रतिनिधी
 श्रीगोंदे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय पिंपळगाव पिसा येथील सावित्रीबाई कला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने घारगाव येथे श्रमसंस्कार शिबिराचे  आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर या कालावधीत ते पार पडणार आहे.
 या शिबिरांतर्गत विद्यार्थ्यांनी आज (बुधवार) नदीवर वनराई बंधारा बांधला. समतल पातळीचे चर, शोषखड्डे, आरोग्यतपासणी, समाज जागृतीपर व्याख्यान, योगसाधना, विविध कलागुण दर्शन आदी  कार्यक्रम शिबीर कालावधीत आयोजित केले जाणार आहेत. या शिबिराला शरदराव जगताप, शरदराव खोमणे, प्राचार्य डॉ.एकनाथ खांदवे, डॉ.शिवाजीराव ढगे, तात्यासाहेब रायकर, देविदास थिटे, मेजर निंभोरे, अरुणाताई खोमणे, पुजाताई शिंदे, सचिन लगड यांनी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रमोद परदेशी, प्रा.नामदेव शितोळे, प्रा.सदाशिव थिटे, प्रा.शिवाजी नेटके, प्रा.बाबासाहेब पंदरकर, प्रा.प्रशांत ढाके, प्रा.अमोल बोराडे, प्रा.राजेश बाराते, प्रा.रेशमा मोटे, प्रा.ज्योती थिटे, प्रा.भाग्यश्री पार्लेकर, प्रा.स्नेहल भोईटे यांनी परिश्रम घेतले