Breaking News

राजीव सातव यांची छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड


नवी दिल्ली ः झारखंड विधानसभा निवडणूक संपल्यानंतर आता सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष दिल्ली विधानसभा निवडणूकीकडे लागले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीतील काँग्रेसच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्राच्या नेत्याची निवड करण्यात आली आहे. काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार राजीव सातव यांची दिल्लीच्या छाननी समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने छाननी समितीची स्थापना केली आहे. पक्ष संघटनेचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या छाननी समितीच्या स्थापनेला मान्यता दिली आहे.